suez
suez 
ग्लोबल

VIDEO: सुएझ कालव्यात जहाज नेमकं कसं अडकलं?

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

गेल्या 6 दिवसांपासून एक मालवाहतून जहाज सुएझ कालव्यामध्ये अडकलंय. हे जहाज केव्हा तेथून काढलं जातं याकडे अख्या जगाचं लक्ष लागून राहिलंय. जगाच्या एका कोपऱ्यात अडकलेल्या जहाजामुळे आपल्याला काय चिंता, पण हे प्रकरण जितकं वाटतंय तितकं सोपं नाहीये. या जहाजाच्या अडकण्यामुळे कच्चा तेलाच्या किंमती तब्बल 5 टक्क्यांनी वाढल्या होत्या. तर हे जहाज नेमकं कसं अडकलं आणि यामुळे जगासह भारतावर काय परिणाम होईल हे आपण पाहूया....

एवर गिवेन नावाचे एक महाकाय मालवाहतूक जहाज सुएझ कालव्यातून जात होते. जहाज चीनहून नेदरलँडच्या रोटरडॅम बंदराकडं निघालं होतं.  त्यावेळी जोराच्या वादळी वाऱ्यांमुळे जहाजावरील नियंत्रण सुटलं आणि ते कालव्यामध्ये तिरकं होऊन मातीत रुतलं. या मालवाहतूक जहाजाचा आकार एवढा अवाढव्य आहे की, यामुळे सर्व कालवा ब्लॉक झालाय. 2 लाख टन वजनाच्या या जहाजाची लांबी तब्बल 500 मीटर आहे, तर रुंदी 59 मीटर. सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर या जहाजाचा आकार 4 फूटबॉल मैदाना इतकाय आणि उंची 10 मजली इमारतीएवढी आहे. जहाजावर जवळपास २० हजार कंटेनर असल्याचं सांगण्यात आलंय. सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT