Pakistan Terror Attack esakal
ग्लोबल

Pakistan Terror Attack: पाकिस्तानात आत्मघाती हल्ला! ५ चिनी नागरिकांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Pakistan Terror Attack: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघाती हल्ला झाला आहे.या दहशतवादी हल्ल्यात 5 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Sandip Kapde

Pakistan Terror Attack: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघाती हल्ला झाला आहे.या दहशतवादी हल्ल्यात 5 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि एक स्थानिक ड्रायव्हरही मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली.

पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सहा चिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हल्लेखोराने त्यांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वामधील शांगला येथे ही घटना घडली.

मारले गेलेले चिनी पेशाने इंजिनिअर होते आणि ते पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी काम करत होते. डॉन न्यूजनुसार, एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात घुसवले आणि दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या घटनेतील मृतांचा आकडाही वाढू शकतो.

याआधीही गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले होते, ज्यामध्ये चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. विशेषत: पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त प्रकल्प, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला विरोध होत आहे, त्यामुळे हे हल्ले झाले आहेत, अशी चर्चा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT