Taiwan Earthquake magnitude 7.2 earthquake hits taiwan within 24 hours  
ग्लोबल

Earthquake : तैवानमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप, 24 तासांत दुसऱ्यांदा हादरे

सकाळ डिजिटल टीम

तैवानमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या24 तासांत येथे दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल असून उजिंग प्रांताला त्याचा फटका बसला आहे. याआधी शनिवारीही येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. आग्नेय तैवानला 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे येथे एक इमारत कोसळून रस्ते खचले होते.

भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भूकंपामुळे रेल्वेचे काही डबे उलटल्याची घटनाही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून येथे सातत्याने भूकंपाचे धक्के येत आहेत. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप युजिंगपासून 85 किमी पूर्वेला दुपारी 12:14 वाजता झाला.

भूकंपाची त्रिज्या सुमारे 10 किमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, तैवानच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, युली येथील एका इमारतीतून चार जणांची सुटका करण्यात आली आहे. तैवान रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व तैवानमधील डोंगली स्टेशनवर ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. मात्र, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. त्याच वेळी, सुमारे 600 लोक सिनिक चीक आणि लियुशिशी पर्वतीय भागात अडकले आहेत. येथे अग्निशमन विभाग अडवलेले रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्याच वेळी, शनिवारी संध्याकाळी आग्नेय तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी नोंदवली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की भूकंपाचे केंद्र ताइतुंग काउंटीमधील गुआनशान टाउनशिपजवळ 10 किलोमीटर (6.2 मैल) खोलीवर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT