तालिबान सरकारमधील अंतर्गत वाद तीव्र sakal
ग्लोबल

तालिबान सरकारमधील अंतर्गत वाद तीव्र

सरकारच्या निर्णयावर कट्टरतावाद्यांचा वरचष्मा

सकाळ वृत्तसेवा

काबूल : अफगाणिस्तानची सत्ता हाती आल्यानंतर तालिबानने इतर समुदायांशी जुळवून घेत सर्वसमावेश सरकार स्थापन करण्याची मागणी होत असताना, तालिबानमध्येच अंतर्गत वाद उफाळून आल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. हंगामी मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यापासून तालिबानमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्यास तयार असलेले नेते आणि जुन्याच विचारांचा आधार घेणारे नेते, यांच्यात असलेला वाद अधिक तीव्र झाला असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

तालिबानमधील सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, तालिबान संघटनेतील वाद अद्याप तरी पडद्यामागेच असले तरी वादाच्या काही घटनांची माहिती आणि काही अफवा वेगाने सर्वत्र पसरत आहेत. गेल्या आठवड्यात अध्यक्षीय प्रासादातच दोन गटांमध्ये हाणामारी होऊन त्यात तालिबानचा प्रमुख म्होरक्या आणि सध्याचा उपपंतप्रधान अब्दुल घनी बरादर याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, तालिबानी प्रवक्त्याने त्याचे खंडन करूनही नंतर स्वत: बरादर याला आधी लेखी निवेदन आणि नंतर ध्वनिफित प्रसिद्ध करत आपण जिवंतच असल्याचे स्पष्ट करावे लागले होते. दुसऱ्या दिवशी तो राष्ट्रीय वाहिनीवरही दिसला होता.

तालिबान आणि अमेरिका यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेत बरादर याची महत्त्वाची भूमिका होती. अमेरिकेचा सैन्यमाघारीचा निर्णय ही या चर्चेचीच फलनिष्पत्ती मानलीजाते. काबूलचा पाडाव झाल्यानंतरही बरादर याने सर्वसमावेशक सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात जाहीर झालेल्या हंगामी मंत्रिमंडळात फक्त पुरुषच आणि त्यातही फक्त तालिबानी नेत्यांचाच समावेश करण्यात आला. बरादर हा तालिबानमधील मवाळ गटाचा नेता मानला जातो.

वादाचे निदर्शक असलेल्या घटना

  • अफगाणिस्तानच्या झेंड्याऐवजी तालिबानचा झेंडा

  • सर्वसमावेशक सरकार अद्याप नाही

  • अनेक कार्यक्रमांमध्ये अब्दुल घनी बरादरची अनुपस्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT