ग्लोबल

तालिबान्यांकडून 'युद्धविराम', आता प्रतीक्षा सत्तांतराची

नामदेव कुंभार

अफगाणिस्तानमधील युद्ध संपल्याची घोषणा अखेर तालिबानी बंडखोरांनी केली आहे. अमेरिकेतील सैनिकांनी माघार घेतल्यानंतर अवघ्या आठवडाभरात तालिबानी बंडखोरांनी संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्तांतराचं काम सुरु झालं आहे. त्यामुळे लवकरच अफगाणिस्तानच्या नामांतराची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या वर्चस्वानंतर संयुक्त राष्ट्राने आज, सोमवारी तातडीने बैठक बोलवली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) असं तालिबानी जाहीर करणार आहेत. यासाठी माजी राष्ट्रपती हामिद करजई, अब्दुल्ला अब्दुल्ला आणि माजी तालिबान नेता गुलबुद्दीन हिकमतयार यांनी एका कमिटीची स्थापना केली आहे. जी शांततापूर्ण हस्तांतरण करण्यास मोलाची भूमिका बजावतील. अमेरिका आणि नाटो यांनी जवळपास 20 वर्ष अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही तालिबान्यांनी अवघ्या आठवडाभरात संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षानंतर पुन्हा तालिबानचे राज्य परत आले आहे. रविवारी तालिबानी बंडखोरांनी राजधानी काबुलवर ताबा मिळवला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष घनी आणि अन्य राजकारण्यांनी देशातून पलायन केलं. आज, तालिबानच्या प्रवक्त्याने अफगाणिस्तानमधील युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना तालिबान्यांनी 20 वर्षांपूर्वीसारखेच राहण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश

Nilesh Ghaiwal: घायवळ टोळीच्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश? पुणे पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

Gmail Safety Tips : तुमचं Gmail हॅक तर झालं नाहीये ना? आत्ताच पाहा नाहीतर होईल खूपच उशीर..सर्व लॉगिन डिवाइस चेक करा एका क्लिकवर

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

SCROLL FOR NEXT