Pavel Durov 
ग्लोबल

Telegram CEO Pavel Durov : टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा

Telegram CEO claims he has over 100 biological kids : टेलीग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांनी नुकतेच एक मोठा खुलासा केला आहे

रोहित कणसे

टेलीग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांनी नुकतेच एक मोठा खुलासा केला आहे. डुरोव यांनी त्यांना १००हून अधिक बायोलॉजिकल मुलं असल्याची दावा टेलीग्रामच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान याबद्दल जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण अनेक जणांकडून नेमकं हे कसं शक्य आहे? असा प्रश्न विचारला जातोय. पण डुरोव यांनीच याबद्दल देखील संपूर्ण माहिती दिली आहे.

डुरोव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे सांगितलं की, तब्बल १५ वर्षांपूर्वी एक मित्र त्यांच्याकडे आला होता. तो मित्र आणि त्याची पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नव्हते. त्यामुळे मित्राच्या विनंतीवर डुरोव यांनी आपले स्पर्म डोनेट केले.

डुरोव यांनी पुढे सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांना जास्तीत जास्त स्पर्म डोनेट करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांचे म्हणणे होते की, डुरोव यांनी जास्तीत जास्त स्पर्म डोनेट करावेत, जेनेकरून जास्त लोकांना मदत होईल.

डुरोव यांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना ही आयडीया तेवढी पसंत पडली नाही, पण ते स्पर्म डोनेट करत राहीले. त्यांनी सांगितले की स्पर्म डोनेशन करत राहील्याने १२ देशात १०० हून अधीक जोडप्यांना मुलं जन्माला घालण्यास मदत झाली. इतकेच नाही तर स्पर्म डोनेशन बंद केल्यानंतरदेखील आयव्हीएफ क्लीनीककडे त्यांचे स्पर्म ठेवण्यात आले आहेत.

टेलीग्राम सीईओ डुरोव यांनी हे देखील सांगितलं की, ते आपल्या डीएनएची माहिती सार्वजनिक करण्याच्या तयारीत आहेत. जेणेकरून त्यांच्या बायोलॉजिकल मुलांना एकमेकांना शोधणे सोपे जाईल. डुरोव यांनी सांगितले की, त्यांनी जे काही केले त्यामुळे त्यांना स्वतःचाच अभिमान वाटतो. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, सध्या जगात हेल्दी स्पर्मची खूप कमतरता आहे. तसेच स्पर्म डोनेशनवर खुलेपणाने बोलले गेले पाहिजे, जेनेकरून जोडप्यांना मदत मिळू शकेल.

Pavel Durov Post

डुरोव यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी स्पर्म डोनेशन एक रिस्क असलेलं काम होतं, मात्र ते आपलं कर्तव्य पूर्ण करण्यापासून मागे हटले नाहीत. डुरोव यांच्या या पोस्टला १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पण डुरोव यांच्या या दाव्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण डुरोव यांचं कौतुक करत आहेत तर काही जण आयव्हीएफ रुग्णालयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT