Elon Musk
Elon Musk 
ग्लोबल

Elon Musk: मस्क यांनी अचानक रद्द केला भारत दौरा; PM मोदींच्या भेटीनंतर करणार होते मोठी घोषणा, X वर सांगितलं कारण..

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क २१ आणि २२ एप्रिल रोजी भारताचा दौरा करणार होते. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी स्वत: याची माहिती दिली होती होती. पण, मिळत असलेल्या माहितीनुसार हा दौरा रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. (Tesla Elon Musk postpones India trip meeting Prime Minister Narendra Modi)

सूत्रांच्या माहितीनुसार, मस्क यांनी आपला दौरा रद्द केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर ते भारतातील बाजार प्रवेशाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता होती. पण, अचानक त्यांचा प्लॅन रद्द झालाय. त्यांचा हा दौरा रद्द होण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. नुकतेच, मस्क यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन केले होते.

इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस कार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भारताने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची नीती राबवली आहे. त्याच भूमिकेतून भारत सरकारने एक नवी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती नीतीची घोषणा केली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक कार कंपन्यांना टॅक्समधून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीकोनातून इलॉन मस्क यांचा भारत दौरा महत्त्वाचा होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, इलॉन मस्क यांनी भारतात २० ते ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ते लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ही घोषणा होण्याची दाट शक्यता होती. पण, तुर्तास याबाबतची घोषणा पुढे ढकलली आहे असंच म्हणावं लागेल. पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की ते आतापर्यंत दोनवेळा मस्क यांना भेटले आहेत. मस्क यांना भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे. (Elon Musk)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT