Texas Hostage Situation  CNA
ग्लोबल

अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ

Texas Hostage Situation : टेक्सास पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला आहे.

सुधीर काकडे

अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) बंदुकधाऱ्याने काही नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ माजली आहे. या घटनेनं सध्या टेक्सासमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं समजतंय. अमेरिकेतील टेक्सासमध्ये असलेल्या ज्यू सिनेगॉगमध्ये घुसून एका बंदूकधाऱ्याने अनेकांना ओलीस ठेवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कथित बंदूकधारी व्यक्तीने स्वतःची ओळख मुहम्मद सिद्दीकी अशी दिली आहे. ओलीस ठेवलेल्यांपैकी एकाची सुटका करण्यात यश मिळाल्याची देखील माहिती समोर आली आहे. (Texas Synagogue Hostage)

अमेरिकेतील माध्यामांनी दिलेल्या बातम्यांनुसार, तो स्वत: ला एफबीआय एजंटच्या हत्येप्रकरणी 86 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचे सांगत आहे. तरी एफबीआयने म्हटले आहे की, त्यांना अद्याप बंदूकधारी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुष्टी केलेली नाही. इमारतीत किती लोक आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बंदुकधारी हा आफियाचा भाऊ नसल्याचं स्पष्टीकरण आफियाच्या भावाच्या वकिलांनी दिलं आहे. वकिलाने सांगितले की, त्यांचे अशील सुरक्षा यंत्रणांना फोन करत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की या संपूर्ण घटनेत त्यांचा सहभाग नाही.

बायडेन सतत सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी ट्विट करून राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना घडामोडींची माहिती दिल्याचं सांगितलं आहे. साकी यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, त्यांची वरिष्ठ टीम बायडेनला माहिती देत ​​राहील. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे अनेक वरिष्ठ सदस्य संस्थांच्या ते सतत संपर्कात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT