Texas Attack Sakal
ग्लोबल

माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू

जो बायडन यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून हिंसक शक्तींच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टेक्सासमधल्या शाळेवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या शाळेवर झालेल्या हल्ल्यात १८ लहान मुलांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. अमेरिकेने आता या हिंसक शक्तींच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन यानिमित्ताने राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केलं आहे.

व्हाईट हाऊस इथून बायडन यांनी टेक्सासमधल्या हल्ल्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. या हिंसक शक्तींच्या विरोधात आपण कधी आवाज उठवणार आहोत? प्रत्येक पालकाने, या देशातल्या प्रत्येक नागरिकाने केवळ दुःख न वाटून घेता, ही घटना लक्षात ठेवून त्याविरोधात कृती करावी. निवडून दिलेल्या प्रत्येक प्रतिनिधीला हे लक्षात आणून द्यायला हवं की आता काहीतरी करण्याची वेळ आलीये, असं बायडन म्हणाले आहे.

अमेरिकेतल्या एका शाळेत घुसून एका व्यक्तीने केलेल्या बेछुट गोळीबारात शाळेतल्या १८ लहान मुले ठार झाली आहे. त्यासोबतच तीन शिक्षकांचाही मृत्यू झाला आहे. तर शाळेतले काही कर्मचारी आणि पोलीसही जखमी झाले आहे. पोलिसांसोबतच्या झटापटीत हल्लेखोरही मारला गेल्याचं वृत्त हाती येत आहे.

हा हल्लेखोर १८ वर्षांचा असून याच शाळेचा माजी विद्यार्थी होता. याने हल्ल्याआधी आपली गाडी शाळेच्या बाहेर लावली आणि त्यानंतर बंदूक घेऊन आत घुसत त्याने बेछुट गोळीबार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT