A massive crane collapse on a busy railway track caused a deadly accident, killing 22 people and injuring over 30, triggering large-scale rescue operations.

 

esakal

ग्लोबल

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Crane Collapses on Railway : बँकॉकहून थायलंडमधील ईशान्य प्रांतात जाणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला आहे.

Mayur Ratnaparkhe

Thailand railway accident: थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवाढव्य क्रेन रेल्वेवर कोसळल्याने रेल्वे रुळावरून घसरली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर किमान ३० जण जखमी झाले आहेत. बांधकाम सुरू असलेली क्रेन ट्रेनवर पडल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

थायलंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून थायलंडमधील ईशान्य प्रांतात जाणारी एक रेल्वे रुळावरून घसरली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणची एक मोठी क्रेन रेल्वेच्या डब्यावर कोसळल्याने हा अपघात झाला. पोलिसांच्या मते, बँकॉकच्या ईशान्येस २३० किलोमीटर अंतरावर बुधवारी हा अपघात झाला.

क्रेन रेल्वेच्या एका डब्यावर कोसळल्याने,  रेल्वे रुळावरून घसरली आणि त्यानंतर रेल्वेच्या डब्याला आग देखील लागली होती. घटनास्थळी सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. शिवाय, घटनास्थळाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर  होत आहेत.

 बचाव कर्मचारी जखमींना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आग आटोक्यात आणण्यात आली आहे, परंतु बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

IND vs NZ, 2nd ODI: भारतावर पराभवाची संक्रांत! डॅरिल मिशेलचं शतक, विल यंगनेही दिली भक्कम साथ; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

सोलापूर महापालिका निवडणूक! ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा; क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या; शहरात ४६ ठिकाणी फिक्स पॉइंट

Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

SSC and HSC Exam Centers: मोठी बातमी! दहावी-बारावीच्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT