ग्लोबल

Nobel Prize 2023: कोविड लस निर्मितीत योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize 2023 for Medicine award

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- २०२३ साठीचे शरीरविज्ञान किंवा औषधशास्त्रासाठीच्या नोबेल पारितोषिकांची घोषणा झाली आहे. कॅटलिन कारिको (Katalin Karikó) आणि ड्रिव वेईसमन (Drew Weissman) यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. प्रभावशाली mRNA कोविड लस निर्मितीमध्ये या शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे योगदान होते. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (The 2023 Nobel Prize in Physiology or Medicine awarded to Katalin Karikó and Drew Weissman)

कोरोना महामारीच्या काळात जगावर मोठं संकट ओढावलं होतं. यावेळी कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारी लस निर्माण करणे आवश्यक होती. अशा काळात या दोन्ही वैज्ञानिकांनी mRNA आपल्या इम्युन सिस्टिमवर कसा प्रभाव टाकतो याचा अभ्यास केला.त्यांच्या या अभ्यासामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना लस निर्मिती शक्य झाली, असं नोबेलच्या समितीने घोषणा करताना सांगितले.

नोबेल पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. दरवर्षी हा पुरस्कर असामान्या काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. नोबेल समितीमध्ये ५० तज्ज्ञांचा समावेश होता. मानवजातीसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ओषधशास्त्रातील वैज्ञानिकांना हा पुरस्कार दिला जातो.

आतापर्यंत शरीरविज्ञान किंवा औषधशास्त्रामध्ये ११३ नोबेल पारितोषिक जाहीर झालेले आहेत. १९०१ पासून हे पुरस्कार दिले जातात. आतापर्यंत १२ महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे. फ्रेडरिक जी बँटिंग हे सगळ्यात कमी वयात पुरुस्कार मिळणारे वैज्ञानिक आहेत. त्यांना वयाच्या ३२ व्या वर्षी इन्सुलिनच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT