Israel Hamas War Esakal
ग्लोबल

Israel Hamas War: हमासला मोठा धक्का! इस्राइलला मिळाला 'सर्वात मोठा बोगदा', पहा व्हिडीओ

Israel Hamas War: हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे. लष्कराने याला हमासच्या नेटवर्कचा 'सर्वात मोठा' बोगदा म्हटले आहे. या चार किमीच्या बोगद्यातून वाहनांची ये-जाही शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचा दावाही लष्कराने केला आहे, ज्याचा वापर हल्ल्यासाठी केला जाणार होता.(Latest Marathi News)

बोगद्याचे प्रवेशद्वार तटबंदीच्या इरेझ क्रॉसिंगपासून आणि जवळच्या इस्रायली लष्करी तळापासून केवळ काहीशे मीटर अंतरावर आहे.

लष्कराने सांगितले की, हा बोगदा चार किलोमीटरहून अधिक लांब आहे आणि त्याची रुंदी इतकी आहे की, त्यातून वाहने आरामात जाऊ शकतात. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा बोगदा गाझामधील एका मोठ्या बोगद्याच्या नेटवर्कशी जोडलेला आहे, जिथून 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या तयारीसाठी वाहने, अतिरेकी आणि शस्त्रे पुरवली गेली असावीत.

"सध्या हा गाझामधील सर्वात मोठा बोगदा आहे," असे मुख्य लष्करी प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी शुक्रवारी बोगद्याच्या प्रवेशद्वाराला भेट दिल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मात्र, हा बोगदा ऑक्टोबर २०१६ मध्ये वापरण्यात आला होता की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Latest Marathi News)

लष्कराचे प्रवक्ते मेजर नीर दिनार यांनी सांगितले की, इस्रायली सुरक्षा दलांना 7 ऑक्टोबरपूर्वी बोगद्याची माहिती नव्हती कारण इस्राइलच्या सीमा रक्षकांना फक्त इस्रायइमध्ये प्रवेश करणारे बोगदे सापडले. शुक्रवारी बोगद्याला भेट दिलेल्या दिनार यांनी सांगितले की, तो गाझामध्ये सापडलेल्या इतर बोगद्यांपेक्षा दुप्पट उंच आणि तीनपट रुंद आहे.

ते पुढे म्हणाले की, बोगदा हवेशीर आणि विजेने सुसज्ज आहे आणि काही ठिकाणी तो 50 मीटर खोलवर जातो. बोगद्याचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी लाखो डॉलर्स, तसेच मोठ्या प्रमाणात इंधन आणि कामगारांची आवश्यकता असेल. यादरम्यान हागारीने हमास नेता याह्या सिनवार याचा भाऊ मोहम्मद सिनवार यांचा व्हिडिओही दाखवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते वाहनात बसून बोगद्याच्या आत गाडी चालवत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT