putin  Sakal
ग्लोबल

तिसऱ्या महायुद्धाबाबत रशियाच्या मंत्र्याचे मोठे विधान, दिला इशारा

या विधानानंतर रशिया अणवस्त्र हल्ल्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनच्या युद्ध लवकरात लवकर संपावे अशी आशा जगातील सर्वच नागरिक व्यक्त करत आहेत. यासर्वांमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिसऱ्या महायुद्दाबद्दल आणि अणवस्त्र हल्ल्याबद्दल मोठे विधान केले आहे. रशियातील एका सरकारी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या या विधानानंतर रशिया अणवस्त्र हल्ल्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत.

"तिसरं महायुद्ध झालं तर ते अण्वस्त्र हल्ल्याचं आणि विनाशकारी युद्ध ठरेल", असं वक्तव्य रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लावारोव्ह यांनी मुलाखतीदरम्यान बोलताना व्यक्त केले असून, पुतिन यांनी सर्जेई यांच्या माध्यमातून जगाला तिसऱ्या महायुद्धाबाबत संकेत दिल्याची जोरदार चर्चा केली जात आहे. दरम्यान, मंत्र्याच्या या विधानामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सहा दिवसात 6 हजार रशियन सैन्याचा खात्मा

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा सातवा दिवस असून, गेल्या सहा दिवसांमध्ये 6 हजार रशियन सैनिकांना मारल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. तर दुसरीकडे रशियाकडून करण्यात आलेल्या जोरदार हल्ल्यात खारकीव्ह आणि कीव या शहरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रशिया युक्रेनमध्ये आज होणार पुन्हा चर्चा

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पेटलेला असताना या दोन्ही देशांमध्ये आज चर्चेची दुसरी बैठक पार पडणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत युद्धावर काही ठोस असा तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे आज पार पडणाऱ्या बैठकीकडे सर्वच जगाचे लक्ष लागून राहिले असून, यामध्ये तरी तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल पंत शून्यावर आऊट, गंभीरची रणनीती फसली? पडिक्कलने लाज राखली; श्रीलंका इलेव्हनविरुद्ध ठोकले शतक

Navi Mumbai News: भुयारी मार्गात अडथळा, मोरबे जलवाहिनी हलवणार; कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी

मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

Samagra Shiksha Abhiyan : पुणे जिल्ह्यासह राज्यातील समग्र अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या वीस वर्षाचा वनवास अखेर संपला

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला ३७ खासदारांची दांडी, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT