रास अल अयान - तुर्कस्तानचा पाठिंबा असलेले सीरियातील बंडखोर रविवारी कुर्द सैनिकांवर हल्ला करताना.
रास अल अयान - तुर्कस्तानचा पाठिंबा असलेले सीरियातील बंडखोर रविवारी कुर्द सैनिकांवर हल्ला करताना. 
ग्लोबल

तुर्कस्तानची सीरियामध्ये घुसखोरी

पीटीआय

सिलानपिनार (तुर्कस्तान) - सीरियाच्या सीमेवर असलेल्या एका गावावर तुर्कस्तानच्या सैन्याने ताबा मिळविला असल्याचा दावा तुर्कस्तानने केला आहे. कुर्द बंडखोरांशी लढत असलेल्या तुर्कस्तानने रास अल-अयान या गावावर बाँबवर्षाव करत त्यावर ताबा मिळविला. 

अमेरिकेने या सीरियातून फौजा काढून घेतल्यानंतर आणि तुर्क-कुर्द यांच्यातील ‘अंतहिन संघर्षा’तून लक्ष काढून घेतल्यानंतर तुर्कस्तानने सीरियाविरोधात आक्रमक रूप धारण केले आहे. तुर्कस्तानने सीरियात अतिक्रमण सुरू केल्यानंतर जवळपास एक लाख लोक बेघर झाले असून, या परिस्थितीचा ‘इसिस’ फायदा घेण्याची शक्‍यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तुर्कस्तानला थांबविण्याची मागणी आधीच युद्धजर्जर झालेल्या सीरियाने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे.

तुर्कस्तानी सैनिकांनी सीरियात घुसखोरी करून ताबा मिळविलेल्या गावातील नऊ जणांना पकडून त्यांची जाहीर हत्या केली. 

युरोपमध्ये निदर्शने
तुर्कस्तानने केलेल्या घुसखोरीविरोधात युरोपमधील अनेक देशांमध्ये मानवाधिकार संघटनांनी निदर्शने केली. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांच्याविरोधात नारेबाजीही करण्यात आली. या निदर्शनांमध्ये सुमारे वीस हजार जण सहभागी झाले होते. 

शस्त्रनिर्यात थांबविली
तुर्कस्तानच्या घुसखोरीनंतर फ्रान्स आणि जर्मनीने या देशाला केली जाणारी शस्त्रनिर्यात थांबविली आहे. तसेच, या संघर्षाच्या परिस्थितीनंतर युरोपीय  महासंघाचीही बैठक होणार असून त्यामध्येही तुर्कस्तानवर बंधने घालण्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT