Turkmenistan esakal
ग्लोबल

आमच्या देशात कोरोना फिरकलाच नाही

बाळकृष्ण मधाळे

जगभरातील अनेक देशात कोरोनाची स्थिती भयावह झालीय. (Corona crisis) कोरोनाचं थैमान दिसून येतंय.

जगभरातील अनेक देशात कोरोनाची स्थिती भयावह झालीय. (Corona crisis) कोरोनाचं थैमान दिसून येतंय. त्याचत मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. पण, तुर्कमेनिस्तान (Turkmenistan) या देशानं हा दावा खोडून काढलाय. तुर्कमेनिस्तान म्हणतंय, की गेल्या दोन वर्षात त्यांच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे त्यांचा हा 'दावा' कितपत खराय हा येणार काळ ठरवणार आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (Johns Hopkins University) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, 60 लाख लोकसंख्या असलेला तुर्कमेनिस्तान हा अशा पाच देशांपैकी एक आहे, जिथं एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.

तुर्कमेनिस्तान व्यतिरिक्त इतर तीन देश प्रशांत महासागरातील लहान देश आहेत. तर, चौथा देश उत्तर कोरिया आहे. या देशातून कोणतीही माहिती बाहेर येणं फार मुश्किल आहे. तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरबांगुली बर्डीमुखमेदोव (Gurbanguly Berdymukhamedov) 2006 पासून देशावर राज्य करत आहेत. त्यांनी म्हटलंय, की आमच्या देशात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, संयुक्त राष्ट्रानं सुरु केलेलं राजकारण थांबवावं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

मात्र, तुर्कमेनिस्तानमधील संस्था, पत्रकार आणि कार्यकर्ते सांगतात, देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे, याचे काही पुरावेही आहेत. परंतु रुग्णालयांवर दबाव वाढवण्याचे सरकार काम सुरु आहे. दररोज डझनभर लोक मृत्युमुखी पडत आहेत. राष्ट्रपती आपली प्रतिमा टिकवण्यासाठी व्हायरसच्या धोक्याला कमी लेखत आहेत, असंही काहींचं म्हणणं आहे. तुर्कमेन न्यूजचे रुसलान तुर्कमेन म्हणाले, कोविडमुळे मरण पावलेल्या 60 हून अधिक लोकांची नावे आम्ही गोळा केली आहेत. यात शिक्षक, कलाकार आणि डॉक्टरांचा समावेश आहे. पण, सरकार आपली प्रतिमा टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्राला फसवत आहे आणि यात हकनाक नागरिकांचा बळी जातोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT