Stephanie Matto  Instagram
ग्लोबल

बाटलीत चक्क 'ती' हवा भरून महिलेनं कमावले लाखो रुपये; अजब व्यवसाय बेतला जिवावर

एका बाटलीची किंमत वाचून थक्क व्हाल!

स्वाती वेमूल

गेल्या काही वर्षांत डिजिटल मार्केटस्पेसमध्ये बरेच बदल झाल्याचं पहायला मिळालं. असंख्य नाविन्यपूर्ण उत्पादनांची खरेदी-विक्री सोशल मीडियाद्वारे सहज होऊ लागली. अनेकांनी आपापल्या क्षमतेनुसार, कलेनुसार उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवली. पण तुम्ही कधी बाटलीत फार्ट (पाद) विकल्याचं ऐकलंत का? ऐकायलाच विचित्र वाटणाऱ्या या व्यवसायातून एका ३१ वर्षीय तरुणीने बक्कळ कमाई केली आहे. स्टेफनी माट्टो (Stephanie Matto) या टीव्ही स्टारने चक्क बाटलीत तिचं पाद विकण्यास सुरुवात केली. '९० डे फियान्स' या अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही शोमधून स्टेफनीला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवर तिच्या फॉलोअर्सची संख्या तुफान वाढू लागली. 'असा काही हटके व्यवसाय केल्यास आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि लोकांचं लक्ष वेधलं जाईल, हा विचार माझ्या मनात होता', असं स्वत: स्टेफनी म्हणाली. त्यानुसार ती एका बाटलीत तिचं फार्ट (पाद) (farts in a jar) विकू लागली. यासाठी तिने तिच्या खाण्या-पिण्याच्या सवयीसुद्धा बदलल्या. मात्र याच सवयी तिच्या जिवावर बेतल्या आहेत. हृदयविकाराची भीती वाटताच स्टेफनीने आपला हा अजब व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ, बीन्स आणि अंडी यांचा समावेश होता. पादाच्या वासात काही बदल करण्यासाठी तिने प्रोटीन शेक्ससुद्धा घेण्यास सुरुवात केली. स्टेफनी तिच्या पादाची एक बाटली तब्बल १ हजार अमेरिकन डॉलर्सना विकत होती. तर काहींची किंमत यापेक्षाही अधिक होती. दर आठवड्याला ती जवळपास ५० बाटल्या विकायची. या व्यवसायातून तिने जवळपास २ लाख ५४ हजार अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. आता तब्येतीच्या कारणास्तव तिने हा व्यवसाय बंद केला आहे. "मला हृदयविकाराचा झटका येतोय की काय असं वाटू लागलं होतं. अक्षरश: मी मृत्यूला सामोरं गेले होते. अती केल्यामुळे माझ्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम झाला होता", असं स्टेफनीने कबूल केलं.

"एका दिवसात मी तीन प्रोटीन शेक्स आणि भरपूर ब्लॅक बीन सूप प्यायचे. एकेदिवशी माझ्या पोटात अचानक दुखू लागलं. त्यानंतर श्वास घेण्यास मला त्रास होऊ लागला. हृदयाजवळ मला वेदना जाणवू लागल्या. माझ्या मित्रांनी मला रुग्णालयात दाखल केलं होतं. मी डॉक्टरांना माझ्या व्यवसायाबद्दल सांगितलं नव्हतं, पण माझ्या डाएटबद्दल त्यांना कल्पना दिली. तो हृदयविकाराचा झटका नव्हता. पण पोटातील गॅसमुळे मला प्रचंड वेदना होत होत्या", असं स्टेफनीने सांगितलं. आपलाच अजब व्यवसाय जिवावर बेतल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्टेफनीने तिच्या डाएटमध्ये तातडीने बदल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT