Donald-Trump 
ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरच्या सीइओचे जोरदार प्रत्युत्तर

यूएनआय

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना  ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोशल माध्यमावरील ट्विटर ने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच काही ट्विटला फॅक्ट चेकचा इशारा दिल्यानंतर, ट्विटर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल माध्यमांना शिस्त लावणे गरजेचे असल्याचे म्हणत अन्यथा कंपन्या बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी ट्विटरच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवत, या सगळ्यात विनाकारण आपल्या कर्मचाऱ्यांना ओढू नका असे म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटर या सोशल माध्यमाचा वापर करत ट्विट करत असतात. काही दिवसांपूर्वी ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेल्या काही ट्विटस वर फ्लॅग करत फॅक्ट चेकचा इशारा दिला होता. ट्विटरच्या या संदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा हा संदेश बोलण्याच्या स्वातंत्र्याविरुद्ध असल्याचे म्हणत, ट्विटरचे हे कृत्य म्हणजे २०२० मधील अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे म्हटले होते. याच्याही पुढे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सोशल माध्यमांना शिस्त लावणे गरजेचे असल्याचे सांगत, वेळ आल्यास सोशल माध्यमांवर कारवाई करत बंद करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी हे आपल्या कंपनीच्या समर्थनात पुढे आले असून, यापुढे देखील जागतिक स्तरावरील निवडणुकांविषयी चुकीची किंवा वादग्रस्त माहिती देत राहू आणि यामध्ये चूक आढळल्यास त्याची माफीदेखील मागण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. शिवाय फॅक्ट चेक संदर्भात कंपनीच्या कृतीसाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असल्याचे सांगत याप्रकरणात विनाकारण आपल्या कर्मचाऱ्यांना ओढण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच यातून आपणास सत्याचा न्यायाधीश व्हायचे नसून, केवळ वस्तुस्थिती दर्शविण्याचा हेतू असल्याचे सांगत, जेणेकरुन लोक स्वत:चा निवाडा किंवा मत स्वतः ठरवू शकतील असे म्हटले आहे. आपल्यासाठी पारदर्शकता महत्वाची असून फॅक्ट चेक्समुळे कृतीमागील वस्तुस्थिती समोर येत असल्याचे जोरदार उत्तर जॅक डॉर्सी यांनी दिले आहे. 

दरम्यान, यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मेल-इन-बॅलेट्सला बनावट' आणि 'मेल बॉक्स लुटला जाईल' असा संदेश आपल्या ट्वीट मध्ये लिहीत अधीकृत खात्यावरून शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या या ट्वीट्स वर ट्विटरने फॅक्ट चेकचा संदेश देत, मेल-इन-बॅलेट्सविषयी तथ्य जाणून घ्या असा लिहिलेल्या मजकूरची लिंक दिली होती. या लिंक वरून ट्विटरच्या फॅक्ट चेक्स पेज वर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबधीत त्यांनी केलेल्या खोट्या दाव्यांबाबत माहिती दिसत होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर टीका करत ट्विटरचे हे कृत्य अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे सांगितले होते. शिवाय हा निष्कर्ष सीएनएन आणि अ‍ॅमेझॉन वॉशिंग्टन पोस्टच्या तथ्य-तपासणीच्या आधारावर असल्याचे म्हणत, हा संदेश बोलण्याच्या स्वातंत्र्याविरुद्ध असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT