Ukraine Russia Conflict esakal
ग्लोबल

युक्रेनने रशियन बंडखोरांवर डागले बाॅम्ब, अमेरिकेचा हल्ल्याचा इशारा

रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करु शकतो.

सकाळ डिजिटल टीम

किव \ माॅस्को : रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान सुरु असलेल्या तणावात आता नवीन वळण घेतल्याचे दिसत आहे. रशियातील प्रसारमाध्यमांनी दावा केला की पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांवर युक्रेनच्या लष्कराने ग्रेनेड आणि मोर्टारने हल्ले केले आहेत. यामुळे कराराचे उल्लंघन झाले आहे. सदरील बंडखोर हे रशियन समर्थक मानले जाते. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाईट हाऊसने इशारा दिला आहे, की रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करु शकतो. रशियाच्या स्पुटनिक वृत्त संकेतस्थळानुसार युक्रेनच्या सैन्याने देशाच्या पूर्व भागातील स्वयंघोषित लुगांस्क पीपल्स रिपब्लिकमध्ये गुरुवारी चार ठिकाणांवर मोर्टार गोळे आणि ग्रेनेडने हल्ला केला आहे. या कथित रिपब्लिकचा एक अधिकारी म्हणाला, युक्रेनच्या (Ukraine) लष्कराने मिंस्क कराराचे उल्लंघन केले. शस्त्रसंधीचा भंग करत शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या या करारानुसार रशिया (Russia) समर्थक बंडखोर गटांनी आणि युक्रेनच्या सरकार दरम्यान शस्त्रसंधी झाली होती. त्यानुसार सैन्याची वापसी, आर्थिक संबंधांना सुरुवात, युक्रेनमध्ये घटनात्मक सुधारणा आदींवर सहमती बनली होती. (Ukraine Russia Conflict Ukrainian Forces Fire Mortars On Luhansk People Republic)

रशिया कधीही करु शकतो युक्रेनवर हल्ला

रशियातील प्रसारमाध्यमांचा दावा जर योग्य असे मानल्यास दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेला तणाव आणखीन भडकू शकतो. यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन म्हणाले होते, की मिंस्क करारच पूर्व युक्रेनमधील वाद समाप्त करण्यास एकमात्र उपाय आहे. युक्रेन या करारानुसार वागण्यास कटिबद्ध नसल्याचे दावे वृत्तांमध्ये करण्यात आले आहे. युक्रेन वाद सोडवण्यासाठी होत असलेल्या वार्तापासून मागे फिरत असल्याचे पुतीन म्हणतात. यामुळे नाटो रशियाच्या सीमेजवळ शस्त्रास्त्रे तैनात करित आहे. या दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने इशारा दिला की रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करु शकतो. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्रमंत्री यांना म्युनिचमध्ये होत असलेल्या परिषदेत सहभागी होण्यास सांगितले आहे. यातून जगभरातील नेत्यांना रशियाविरुद्ध एकत्र आणले जाऊ शकेल. व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेन पास्की यांनी रशियाचा हल्ला कधीही होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली आहे. (Ukraine Russia Conflict)

रशियाकडून आणखीन ७ हजार सैन्य तैनात

व्हाईट हाऊस प्रवक्ता म्हणाला, की सर्वांना आपले डोळे उघडे ठेवावे लागेल. बनावट व्हिडिओ आणि रासायनिक शस्त्रांपासून सतर्क राहिले पाहिजे. यापूर्वी युक्रेनने रशियाचा वाढता दबावा दरम्यान बुधवारी ध्वज फडकवून राष्ट्रीय एकतेचे प्रदर्शन घडवले. दुसरीकडे अमेरिकेने म्हटले, की रशियाने युक्रेनच्या सीमेवरुन सैन्य वापसीची घोषणेच्या विरोधात सीमेवर कमीत कमी ७ हजार आणखीन सैन्य तैनात केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT