Imran Khan And Narendra Modi esakal
ग्लोबल

Imran Khan: मोदींशी वादविवादाचा इम्रान यांचा प्रस्ताव

नरेंद्र मोदी यांच्याशी दूरचित्रवाणीच्या व्यासपीठावर वादविवाद करण्याची तयारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दर्शविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को/नवी दिल्ली : मतभेद मिटविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरचित्रवाणीच्या व्यासपीठावर वादविवाद करण्याची तयारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दर्शविली आहे. दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना होत असलेल्या इम्रान यांनी रशिया टुडे या वाहिनीला मुलाखत दिली. रशियन सरकारचे या वाहिनीला निधी पुरविते तसेच सरकारचे त्यावर नियंत्रण आहे. इम्रान म्हणाले की, वादविवादाच्या माध्यमातून मतभेदांवर तोडगा निघाला तर ते एक अब्जाहून जास्त लोकसंख्या असलेल्या भारतीय उपखंडासाठी उपयुक्त ठरेल. (Imran Khan)

दरम्यान, याविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. उभय देश ७५ वर्षांपूर्वी फाळणीनंतर स्वतंत्र झाले. तेव्हापासून संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. आतापर्यंत तीन वेळा युद्ध झाले आहे. दहशतवाद आणि संवाद एका वेळी होऊ शकत नाही असे भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकने दहशतवादी गटांवर निर्बंध लादावेत तसेच संयुक्त राष्ट्रांनी ज्यांचा यादीत समावेश केला आहे त्या तसेच इतर दहशतवाद्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

युक्रेनबाबत मुत्सद्देगिरी

इम्रान या दौऱ्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत. आर्थिक सहकार्याबाबत चर्चेसाठी त्यांनी हा दौरा आखला आहे. युक्रेनबाबतच्या घडामोडींपूर्वी हे नियोजन झाले होते. सध्याच्या घडामोडींबाबत छेडले असता, इम्रान यांनी स्पष्ट केले की, आमचा याच्याशी संबंध नाही. आमचे रशियासह द्विपक्षीय संबंध आहेत, जे आम्हाला खरोखरच बळकट करायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT