Texas News1 
ग्लोबल

United States of America : टेक्सासच्या विधानभवनात अमेरिकेच्या झेंड्यासोबत फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा

या कार्यक्रमात दीडशेच्यावर कलाकारांनी भाग घेतला. तीन वर्षाच्या मुलांपासून ते साठ वर्षाच्या आजोबांपर्यंतच्या कलाकारांचा यात समावेश होता.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेतल्या टेक्सास भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. तसंच अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा कॅपिटॉल बिल्डिंगसमोर मोठ्या दिमाखात फडकला.

महाराष्ट्र माझा, ऑस्टिन ही स्वयंसेवी संस्था अमेरिकेत महाराष्ट्रीयन पारंपारिक ढोल ताशा झांज लेझीम या वाद्यसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी २०१८ साली स्थापन झाली. या वर्षी अमेरिकेत पहिल्यांदा टेक्सास राज्याची राजधानी, ऑस्टिन येथील स्टेट कॅपिटॉल बिल्डिंगच्या (विधानभवनाच्या) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या दणक्यात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अनेक अमेरिकन-भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय पाठींबा दिला होता.

या कार्यक्रमात दीडशेच्यावर कलाकारांनी भाग घेतला. तीन वर्षाच्या मुलांपासून ते साठ वर्षाच्या आजोबांपर्यंतच्या कलाकारांचा यात समावेश होता. अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर छत्रपतीं शिवरायांचा भगवा कॅपिटॉल बिल्डिंगसमोर फडकला.

कार्यक्रमासाठी भव्य मंच उभारण्यात आला होता आणि खास पालखी बनवण्यात आली होती. थ्री डी तंत्रज्ञानाने शिवरायांची मूर्ती प्रिंट केली होती. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या अभिमान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. SAIVA या सिनियर लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वृद्ध महिलांनी ‘हम होंगे कामयाब’ हे गीत सादर केले. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांनी सादर केलेल्या शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.

माय भवानी तुझे लेकरू, वेडात मराठे वीर दौडले सात, सरणार कधी रण प्रभु तरी हे कुठवर साहू घाव शिरी, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती ही गीतांनी सर्व वातावरण शिवमय झाले. कॅपिटॉल बिल्डिंगच्या द ग्रेट वॉक वरून ढोल ताशां लेझीमच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाचे शिखर गाठले गेले. पारंपरिक पद्धतीने शंख वाजवून आणि गारद म्हणून मिरवणुकीची सुरुवात झाली.

मिरवणुकीत पालखीमागे नऊवारी घातलेल्या महिला लेझीम नृत्य सादर करत होत्या. त्यामागे एकूण साठ ढोल आणि ताशा कलाकार वादन करत होते. मिरवणुकीची शेवट महाराष्ट्र माझाच्या कलाकारांनी सादर केलेल्या ढोल ताशा लेझीम आणि झांज यांच्या बहारदार सादरीकरणाने झाली. शेवटी प्रेक्षकांनी आपल्या उत्स्फुर्त नाचाने शिवरायांना अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT