US-election-voting-counting 
ग्लोबल

US Election 2020 : निकालासाठी वाट बघा...

सकाळवृत्तसेवा

अपेक्षेप्रमाणे ‘इलेक्शन डे’च्या दिवशी अमेरिकेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा अंदाज आलेला नाही. ज्यो बायडेन यांच्याकडे आघाडी दिसत असली तरी अद्याप काही महत्त्वाच्या राज्यांमधील चित्र स्पष्ट व्हायचे असून निकाल अनपेक्षित असू शकतो. आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक वेगळी ठरली असून आता निकाल प्रक्रियेतही वेगळेपण राखले जाण्याची चिन्हे आहेत. नेहमीपेक्षा निकाल समोर येण्यास विलंब लागण्याचा अंदाज असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही तसेच सूतोवाच केले आहेत. काही राज्यांनी ‘इलेक्शन डे’नंतरही मतपत्रिका स्वीकारण्याचे धोरण स्वीकारले असल्याने परिस्थिती अवघड झाली असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. 

विजयाचे अंदाज 
मतदानाच्या दिवशी अनेकवेळा माध्यमांद्वारे विजयी उमेदवाराची घोषणा केली जाते. ही घोषणा ते मतदानोत्तर कलचाचणी आणि इतर राजकीय माहितीच्या आधारे जाहीर करतात. मात्र, आजच्या प्रमाणे अटीतटीची लढाई असल्यास मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय काहीही स्पष्टपणे सांगता येत नाही. यंदाही काही मोठ्या राज्यांमध्ये तुल्यबळ लढत असल्याने समर्थकांची धडधड वाढली आहे. एकूणातच, सत्ताधीशासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. 

विलंबाचे कारण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखो मतदारांनी टपालाद्वारे मतदान करण्याचा पर्याय स्वीकारल्याने त्यांची मतमोजणी होण्यास वेळ लागणार. या मतपत्रिका केवळ घडी केल्या जात नाहीत, तर पाकिटबंद करून बॉक्समध्ये टाकल्या जातात. ही पाकिटे फोडून मतपत्रिका बाहेर काढणे, त्यात तांत्रिक चुका झाल्या नाहीत ना हे तपासणे, त्यांची वर्गवारी करणे आणि सरळ करून स्कॅन करणे अशी सर्वसाधारण पद्धत असून काही राज्यांमध्ये ही यंत्रणा तयार असते. त्यामुळे दरवेळी निकाल तातडीने लागतात. यंदा अनेक राज्यांमध्ये लोकांनी प्रचंड संख्येने टपालाद्वारे मतदान केल्याने आणि अनेक राज्यांमध्ये अशा यंत्रणेला परवानगीच नसल्याने मतमोजणीला प्रचंड उशीर लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही यंत्रणा नसलेल्या राज्यांमध्ये मिशीगन, पेनसिल्वानिया आणि विस्कॉन्सिन ही प्रमुख राज्ये आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: आंदोलनादरम्यान कोणतीही 'नारेबाजी' चालणार नाही! दिल्ली आंदोलनात केवळ 'या' चार घोषणा देण्याचं 'सीजेपी'कडून आवाहन

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Live Updates Marathi : पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi : ३ सामने खेळवून बाकावर बसवले, गंभीरच्या निर्णयावर प्रथमच व्यक्त झाला वैभव... म्हणाला, प्रशिक्षक मला..

Temghar Dam: टेमघर धरण ५० टक्के भरले; पुणेकरांसाठी महिनाभराच्या पाण्याचा दिलासा

SCROLL FOR NEXT