Ukraine Russia Crisis
Ukraine Russia Crisis esakal
ग्लोबल

युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा 'रशिया'बाबात मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष केले असून, रशियाच्या अर्थव्यवस्थेवरील पेच घट्ट करणे हे या निर्णयामागचे कारण असल्याचेही बोलले जात आहे. (America Ban Russian Oil Imports)

असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, युक्रेनवरील हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी रशियन तेल आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यानंतरही याचा रशियावर अद्याप कोणताही प्रभाव पडलेला नसून दोन्ही देशांमध्ये तेराव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी बंद करणार असल्याची घोषणा ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी शेलने मंगळवारी केली आहे. शेलने एका निवेदनात म्हटले आहे की, ते सर्व हायड्रोकार्बन, कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू आणि द्रवीभूत नैसर्गिक वायूची (LNG) खरेदी टप्प्याटप्प्याने रशियाकडून बंद करणार असल्याचे म्हटले आहे.

त्याशिवाय शेलने रशियातील आपले सर्व्हिस स्टेशन आणि इतर ऑपरेशन्स बंद करण्याचादेखील निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शेलने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT