us public policy expert neera tandon says share her experience as a daughter of immigrants with diaspora
us public policy expert neera tandon says share her experience as a daughter of immigrants with diaspora  
ग्लोबल

US : नीरा टंडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वीकारला पदभार; म्हणाल्या PM मोदींच्या दौऱ्यासाठी…

सकाळ डिजिटल टीम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमिवर अमेरिकेतील देशांतर्गत धोरणविषयक सल्लागार भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय दौऱ्याची तयारी सुरू असून या तयारीमध्ये प्रशासन व्यस्त असल्याची माहिती दिली आहे.

टंडन यांनी सांगितलं की, एका स्थलांतरितांची मुलगी म्हणून त्या स्वतःचे अनुभव प्रवासी समुदायाशी शेअर करू इच्छितात. तसेच व्हाईट हाऊसच्या देशांतर्गत सल्लागार म्हणून काम करताना इमिग्रेशनच्या प्रश्नावर त्या काम करतील. तसेत भारतीय डायस्पोरा समुदाय ही दोन्ही देशाची संपत्ती असल्याचे सांगितले.

५२ वर्षीय टंडन यांनी शनिवारी विद्यमान सल्लागार सुसान राइस यांची व्हाइट हाऊसमध्ये देशांतर्गत धोरणविषयक सल्लागार म्हणून जागा घेतली. व्हाईट हाऊसमध्ये हे सर्वात शक्तीशाली पदांपैकी एक आहे. त्यांनी सांगितलं की देशांतर्गत घोरण सल्लागार म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल खूप उत्साहात असल्याचे देखील सांगितलं. महत्वाचे म्हणजे नीरा टंडन या व्हाईट हाऊसच्या सल्लागार समितीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अधिकारी बनल्या आहेत.

न्यूयॉर्कमध्ये उंची-वजनावर आधारित भेदभावावर बंदी

न्यूयॉर्क सिटीचे मेयर एरिक एडम्स यांनी एका कायद्यावर स्वाक्षरी करत वजन आणि उंची सारख्या शारिरीक मापदंडांच्या आधारे होणारा भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वजन आणि उंची आता वंश, लिंग आणि धर्म यासारख्या संरक्षित वर्गांच्या यादीत सामील करण्यात आले आहेत. मेयरनी सांगितलं की आपण कसेही दिसले, आपण सर्वजण रोजगार आणि घरांसाठी समान हक्कांसाठी पात्र आहोत. डेमोक्रॅटिक नेते अॅडम्स म्हणाले की, या अध्यादेशामुळे सर्व न्यूयॉर्ककरांना समान संधी मिळण्यास मदत होईल.

यामुळे काम करण्यासाठी अधिक समावेशक, राहण्यासाठी योग्य आणि भेदभावापासून संरक्षण करण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करेल. हा कायदा परिषदेसमोर ठेवला असता काही व्यापारी नेत्यांनी या कायद्याच्या विरोधात मत दिलं.

सेवा इंटरनॅशनल अॅकॅडमी स्वयंसेवकांना देणार प्रशिक्षण

वॉशिंग्टन - स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यासाठी 'सेवा इंटरनॅशनल' ने अमेरिकेत आपली पोहोच वाढवण्यासाठी अकादमी उघडण्याची घोषणा केली आहे. संघटनेचे अध्यक्ष अरुण कंकाणी म्हणाले की, २०२७ पर्यंत १०० शाखांपर्यंत उघडण्याचे उद्देश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT