ग्लोबल

अमेरिका-ब्रिटनने केली पुतिन यांची कोंडी; रशियन तेलावर घातली बंदी

सकाळ डिजिटल टीम

रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस असून परवा झालेली चर्चेची तिसरी फेरीही निष्फळ ठरली आहे. या युद्धामुळे एकीकडे भीषण मंदी आणि महागाईचं सावट आहे. तर दुसरीकडे सर्वांधिक चिंता ही तेलाच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढण्याची आहे. एकीकडे अमेरिकेने युक्रेनवर रशियाने लादलेल्या या युद्धामध्ये रशियाच्या (Russian President Vladimir Putin) विरोधात भूमिका घेतली असून युक्रेनला आपलं सहाय्य जाहीर केलंय. रशियाला धडा शिकवण्याची घोषणा करत अमेरिकेने अनेक प्रकारचे निर्बंध लादणार असल्याचं याआधीच जाहीर केलंय. त्याच पार्श्वभूमीवर आता अमरिकेने रशियाच्या तेलावर आणि गॅसवर बंदी घातली आहे. (Joe Biden has banned Russian oil and gas)

एकीकडे जगभरात गॅसच्या किंमती वाढत असतानाच दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियन तेल आणि गॅसवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर लगेचच ब्रिटननेही अशीच घोषणा करत म्हटलंय की, ते वर्षाच्या अखेरीपर्यंत रशियन तेलाची आयात टप्प्याटप्प्याने बंद करणार आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे देशातील रशियाच्या इंधनाचा प्रवाह बंद होणार आहे. या सगळ्या घडामोडीनंतर रशियानेही तातडीने जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी इशारा देताना म्हटलंय की, जर मित्र राष्ट्रांनी रशियन तेल आयात करणे थांबवलं तर रशिया युरोपच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा पाइपलाइनद्वारे खंडित करू शकेल. पुढे ते असंही म्हणाले की, हे पुरेसं स्पष्ट आहे की रशियन तेलावरील कसल्याही प्रकारच्या निर्बंधामुळे जागतिक बाजारपेठेसाठी नकारात्मकच परिणाम होणार आहेत.

निर्णयाचे भारतावरील परिणाम

जागतिक बाजारात कच्चे तेल व नैसर्गिक वायू विकण्यास रशियावर युरोप व अमेरिका निर्बंध लादल्यामुळे युरोपचा नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होईल तसेच कच्च्या तेलाचे दर वाढल्याने सर्वत्र चलनवाढ व महागाई होईल, अशी शक्यता आहे. या भीतीचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. परकीय चलन बाजारात काल डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव ७६.८५ असा उघडला होता, मात्र नंतर तो घसरून ७७.०१ पर्यंत गेला. कालच्यापेक्षा तो ८४ पैशांनी घसरला. युद्धामुळे डॉलर, सोने आदी सुरक्षित घटकांची खरेदी गुंतवणूकदार करीत असल्याचे रॅलिगेअर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेवा यांनी सांगितले. लवकरच रुपया ७७.५० पर्यंत जाईल, तर मध्यम कालावधीत तो ७९ पर्यंतही कोसळू शकतो, असेही त्या म्हणाल्या. शेअरबाजारात, तसेच सर्वत्र परकीय गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत असल्याने डॉलर, सोने महागत असून शेअरबाजार कोसळत चालला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT