taliban e sakal
ग्लोबल

तालिबान्यांनी हजारो दहशतवाद्यांची केली सुटका, पाहा Video

सकाळ डिजिटल टीम

काबूल : तालिबानने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर (Taliban attack on Afghanistan) ताबा मिळविला आहे. त्यांनी रविवारी काबूलमध्ये देखील प्रवेश केला. आता याच तालिबान्यांनी हजारो कैद्यांची तुरुंगातून सुटका केली आहे. यामध्ये 'ISIS' आणि 'अल कायदा'च्या हजारो दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अफगाणिस्तानच्या एका वृत्तसंस्थेने देखील हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

रविवारी पहाटे तालिबान्यांनी बग्राम एअरबेसवर ताबा मिळविला. याचठिकाणी पुल-ए-चरकी कारागृह असून येथून ५ हजार कैद्यांची सुटका करण्यात आली. हे तुरुंग अफगाणिस्थानातील सर्वात मोठे तुरुंग असून याठिकाणी अनेक कुख्यात कैद्यांना ठेवण्यात येते. यामध्ये अल-कायदा आणि तालिबानचे कैदी असल्याचे सांगितले जात आहे. एका अफगाण वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ पब्लिश केला असून यामध्ये दहशतवादी कैद्यांची सुटका करत असल्याचे दिसून येत आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये घुसले. त्यामुळे शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तालिबान राजवटीचा अनुभव असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती, दहशत आहे. अफगाणिस्तानात कशी गोंधळाची स्थिती आहे, त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी उसळली आहे. शेकडो लोक विमानतळावर दाखल होत आहेत.

काबूल विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. मूळ अफगाण नागरिकांनीही देशाबाहेर जाण्यासाठी गर्दी केलीय. रस्त्यावर तालिबानी दहशतवाद्यांना पाहून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालीय, असे काबूल पीस फोरमच्या शरीफ साफी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT