वॉशिंग्टनमध्ये भारतीय उद्योजकाची हत्या Sakal
ग्लोबल

वॉशिंग्टनमध्ये भारतीय उद्योजकाची हत्या; हल्लेखोराचा शोध सुरू

अमेरिकेत गेल्या महिन्यापासून पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यात आता विवेक चंदर तनेजा (वय ४१) या भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या महिन्यापासून पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यात आता विवेक चंदर तनेजा (वय ४१) या भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. वॉशिंग्टनमध्ये एका हॉटेलच्या बाहेर झालेल्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली.

या हत्येची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २ फेब्रुवारीला रात्री दोन वाजता घडली. तनेजा यांची अज्ञात व्यक्तीशी वादावादी झाल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून ढकलून देण्यात आले.

तनेजा यांचे डोके पदपथावर आपटले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी जखमी तनेजा यांना रुग्णालयात दाखल केले. बुधवारी (ता.७) त्यांचा मृत्यू झाला. तनेजा यांची हत्या झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

विवेक तनेजा हे डायनॅमो टेक्नॉलॉजीज या तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक होते. अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारला तंत्रज्ञान विश्लेषक म्हणून ते सेवा देत होते, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिल्याचे ‘एनबीसी वॉशिंग्टन’ने म्हटले आहे. तनेजा यांनी व्हर्जिनिया विद्यापीठ, जॉर्ज मेसन विद्यापीठ आणि जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती.

२५ हजार डॉलरचे इनाम

या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाला. तनेजा यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि तिचा शोध घेण्यासाठी मेट्रोपॉलिटन पोलिस लोकांची मदत घेत आहेत.

कोलंबिया जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडातील संशयितांना अटक करण्यासाठी त्यांची माहिती पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून २५ हजार डॉलरचे बक्षीस दिले जाते. त्यानुसार तनेजा यांच्या हल्लेखोरांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गरज पडल्यास ‘एन्काऊंटर’ही करणार; पदभार स्वीकारताच विश्वास नांगरे-पाटलांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अश्विनचा संताप; थेट IPL वरच फोडलं खापर, म्हणाला...

EV Policy: पेट्रोल-डिझेल वाहनांना झटका! दिल्लीत नवे EV धोरण लागू; सरकार भरघोस प्रोत्साहन देणार, काय फायदा होणार?

Ayodhya Ram Mandir: चंपत राय चौकशीच्या फेऱ्यात, चोरी प्रकरणानंतर बदलणार कारभाराची रचना? CEO-सचिव पदांसह मोठ्या फेरबदलाची तयारी"

Latest Marathi News Live Update: कोर्टाने नवीन उदाहरण समोर आणलं आहे- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT