ग्लोबल

भारतीय वंशाच्या नागरिकास 46 वर्षे कारावास

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन: अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कॅनडाहून अमेरिकेत पोचलेला भारतीय वंशाचा आरोपी दिलबाग सिंग (वय 57) याला अरिझोनातील संघ न्यायालयाने 46 वर्षांची कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनावली.

दिलबाग सिंग हा कॅनडातील ओटारियोचा रहिवासी आहे. न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार जानेवारी 2017मध्ये सिंग याने एका अल्पवयीन मुलीशी ऑनलाइन मैत्री केली. चार महिन्यांनंतर त्याने तिच्याबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली. या कारणासाठी मे 2017मध्ये तो कॅनडाहून अरिझोनात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अमेरिकेतील न्याय व विधी मंत्रालयाविरोधात मे 2006पासून बाल लैंगिक अत्याचाराविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. "सुरक्षित बालपण' या प्रकल्पाअंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT