weather update torrential rain with winds Andamans sakal
ग्लोबल

अंदमानात वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘असानी’ चक्रीवादळात रुपांतर होणार

सकाळ वृत्तसेवा

पोर्ट ब्लेअर : आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या अंदमान समुद्रालगतच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. उद्या (ता. २१) त्याची तीव्रता आणखी वाढून ‘असानी’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून या वातावरणामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे, बेटांवरील किनारी भागातील लोकांचे आज सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. अंदमान द्वीपसमूहाजवळच या वर्षातील पहिल्या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे.

प्रतिकूल हवामानामुळे बेटांदरम्यान होणारी जलवाहतूकही थांबविण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबारची चेन्नई व विशाखापट्टणमशी होणारी जलवाहतूकही बंद करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन अंदमान व निकोबारमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे(एनडीआरएफ) १५० जवान तैनात करण्यात आले आहेत. बेटांवर सहा मदत छावण्याही सुरू केल्या आहेत. पोर्ट ब्लेअरसह उत्तर आणि मध्य अंदमान तसेच दक्षिण अंदमानात जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यातील नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत.

आज चक्रीवादळात रूपांतर

हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र रविवारी कार निकोबारच्या वायव्येला ११० किलोमीटरवर होते. उद्या (ता. २१) त्याची तीव्रता आणखी वाढून त्याचे ‘असानी’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने ट्विट करून दिली. मात्र, या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसून ते बांगलादेश-म्यानमार किनाऱ्याकडे सरकण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT