White House Jen Psaki no violation of sanctions by India Crude oil
White House Jen Psaki no violation of sanctions by India Crude oil सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

भारताकडून निर्बंधांचे उल्लंघन नाही; जेन साकी

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल घेण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास ते अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन नसेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. युक्रेनवर हल्ला केल्यामुळे अमेरिकेने रशियावर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी हे स्पष्टीकरण दिले.

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाले, की आम्ही रशियाविरुद्ध लागू केलेल्या शिफारसी आणि निर्बंधांचे पालन करा, हाच आमचा कोणत्याही देशाला संदेश आहे. मात्र, भारताने रशियाचा सवलतीच्या दरात कच्चे तेल घेण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास ते या निर्बंधांचे उल्लंघन ठरणार नाही. तरीही, जागतिक इतिहासातील महत्त्वाचे पुस्तक या क्षणी लिहिले जात असताना कोणती बाजू घ्यायची, हेही ठरवायला हवे. रशियन नेतृत्वाला पाठिंबा देणे म्हणजे त्या देशाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला पाठिंबा देण्यासारखे आहे. रशियाच्या या आक्रमणाचे विनाशकारी परिणाम होत आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

भारताने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला पाठिंबा दिलेला नाही. रशिया व युक्रेनने परस्परसंवादातून हा प्रश्न सोडवावा, अशी भारताची भूमिका आहे. संयुक्त राष्ट्रातील रशियाविरुद्धच्या सर्व ठरावांवेळी भारत अलिप्त राहिला. या पार्श्वभूमीवर भारत रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. भारतीय-अमेरिकी वंशाचे खासदार डॉ. ॲमी बेरा यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT