WHO director 
ग्लोबल

कोरोनाचं संकट हे काही अंतिम नाही; WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

सकाळवृत्तसेवा

जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटलंय की, कोरोना व्हायरसचे संकट हे काही शेवटी महामारी नाहीये. पशु कल्याण आणि पर्यावरणीय बदलांशी दोन हात केल्याशिवाय मानवी आरोग्यातील सुधारणेचे प्रयत्न निष्फळ आहेत. त्यांनी आज रविवारी आयोजित होणाऱ्या International Day of Epidemic Preparedness च्या एक दिवस आधी व्हिडीओद्वारे हे मत व्यक्त केलं. WHO च्या प्रमुखांनी म्हटलं की या कोविड-19 च्या महामारीपासून धडा घेण्याची ही वेळ आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, खूप मोठ्या काळापासून जग भीतीच्या सावटाखाली आहे.

त्यांनी म्हटलं की, आपण एका प्रकोपाशी दोन हात करण्यासाठी पैसे फेकतो आणि जेंव्हा तो संपतो तेंव्हा आपण त्याविषयी विसरुन जातो. पुढील येणाऱ्या परिस्थितीसाठी आपण काहीच करत नाही. असं करणं हे अत्यंत भयावह आहे आणि ही दूरदृष्टी अजिबातच नाहीये. त्यांनी म्हटलंय की, इतिहास साक्ष आहे की ही काही शेवटची महामारी असणार नाहीये. महामारी या जीवनातील एक वास्तव आहेत. या महामारीने मनुष्याच्या आरोग्य, प्राणी आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या नातेसंबंधांना अधोरेखित केलं आहे. घातक पर्यावरणीय बदलांचा आपल्या पृथ्वीला धोका आहे. यामुळे आपली पृथ्वी राहण्यायोग्य उरत नाहीये. 

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन समोर आल्याने सध्या जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपातील जवळपास आठ देशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे प्रमुख हंस क्लूगे यांनी म्हटलंय की मागच्या स्ट्रेनच्या तुलनेत कोरोनाचा हा नवा स्ट्रेन वेगाने तरुणांमध्ये पसरतो आहे. त्यामुळे खबरदारी बाळगणे, खूपच आवश्यक आहे. या नव्या स्ट्रेनचा परिणाम काय आणि कशापद्धतीने होतो, याबाबतचे संशोधन सध्या सुरु आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT