corona pune 
ग्लोबल

युरोपातील आठ देशांमध्ये सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; WHO ने दिली माहिती

सकाळवृत्तसेवा

जिनिव्हा : कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन समोर आल्याने सध्या जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपातील जवळपास आठ देशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की त्यांचं प्राप्त परिस्थितीवर लक्ष आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे प्रमुख हंस क्लूगे यांनी म्हटलंय की मागच्या स्ट्रेनच्या तुलनेत कोरोनाचा हा नवा स्ट्रेन वेगाने तरुणांमध्ये पसरतो आहे. त्यामुळे खबरदारी बाळगणे, खूपच आवश्यक आहे. या नव्या स्ट्रेनचा परिणाम काय आणि कशापद्धतीने होतो, याबाबतचे संशोधन सध्या सुरु आहे. 

मागच्या आठवड्यात ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनबाबत पहिल्यांदा माहिती मिळाली होती. विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारच्या कोरोना विषाणुचे संक्रमण SARS-CoV-2 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे. नवा स्ट्रेन आल्यानंतर अनेक देशांनी ब्रिटनकडे होणारी वाहतुक बंद केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्चला कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं होतं.

जगभरात कोरोनाची 7.98 कोटी प्रकरणे
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अनुसार, जगभरात कोरोनाचे 7.98 कोटी संक्रमणे सापडली आहेत. तर 17.4 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संक्रमणाने अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे 1 कोटी 87 लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. तर तीन लाख तीस हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  

भारत देश कोरोना संक्रमणाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आतापर्यंत एक कोटी 47 लाखाहून अधिक संक्रमणे सापडली आहेत. एक लाख 47 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय ब्राझीलमध्ये 74 लाख, रशियामध्ये 29 लाख, फ्रान्समध्ये 26 लाख, ब्रिटनमध्ये 22 लाख, तुर्कीमध्ये 21 लाख, इटलीमध्ये 20 लाख, स्पेनमध्ये 18 लाख, जर्मनीमध्ये 16 लाख संक्रमणे समोर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT