ग्लोबल

Afghanistan Crisis : तालिबानी सत्तेची सूत्रे कोणाकडे?

सकाळ वृत्तसेवा

Afghanistan Crisis : तालिबान संस्थापकांपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरादर याची अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदावर निवड होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. तालिबानमधील तुलनेने ‘मवाळ चेहरा’ म्हणून तो ओळखला जातो. विशेष म्हणजे अफगाणिस्तानवरील पाकिस्तानी व विशेषतः आयएसआयच्या वरचष्म्याचा विरोधक अशी त्याची ओळख आहे. तालिबानचा राजकीय प्रमुख म्हणून त्याचा परिचय आहे. अर्थात बरादर याच्यावरही हैबतुल्ला अखुन्जादा याचे स्थान मानले जाते. तो तालिबनाचा सर्वोच्च धार्मिक व अध्यात्मिक नेता म्हणून ओळखला जातो आणि तालिबानच्या राजकीय, धार्मिक व लष्करी निर्णयात त्याचा शब्द अंतिम मानला जातो, असे सांगण्यात येते.

तालिबानच्या काही प्रमुख नेत्यांबद्दलची माहिती हळूहळू बाहेर येत आहे. हैबतुल्ला याला पाश्‍चात्य वर्तुळात तालिबानचा ‘लीडर ऑफ द फेथफुल’ म्हणून ओळखले जाते. इस्लामी कायद्याचा तो तज्ज्ञ आहे. त्याच्या आधी अख्तर मन्सूर हा तालिबानचा सर्वोच्च धार्मिक नेता होता. २०१६ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्याचा अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर मृत्यु झाला आणि त्यानंतर हैबतुल्ला त्याच्या जागी आली आणि तेव्हापासून तो भूमिगत आहे. याही आधी हैबतुल्ला हा कुचलाक या पाकिस्तानातील गावातील मशिदीत १५ वर्षे धर्मगुरुचे काम करीत होता.

मुल्ला उमरचा मुलगाही सक्रीय

मुल्ला महंमद याकूब हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा मुलगा असल्याची माहिती मिळते. तो तालिबानच्या लष्करी मोहिमांचा प्रमुख म्हणून ओळखला जातो. तालिबानच्या अंतःस्थ वर्तुळात त्याचा समावेश होतो. तो केवळ तिशीतील असल्याचे समजते. मुल्ला उमरच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार म्हणून याकूबचे नाव पुढे करण्यात आले. परंतु आपण अतिशय तरुण आणि अननुभवी असल्याचे कारण सांगून त्याने हैबतुल्लाचे नाव तालिबान प्रमुखपदासाठी सुचविले. सिराजुद्दिन हक्कानी हा मुजाहिदीन कमांडर जलालुद्दिन हक्कानीचा मुलगा आहे. ‘हक्कानी नेटवर्क’ म्हणून त्याची संघटना ओळखली जाते. तालिबानचे आर्थिक व्यवहार आणि पैसा तसेच लष्करी साधनसंपत्तीची देखरेख या सिराजुद्दिन हक्कानीच्या ताब्यात आहे. पन्नाशीतीली सिराजुद्दिन हा दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. अमेरिकेने त्याच्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. सिराजुद्दिन हाही अज्ञातवासात असतो.

मुल्ला अब्दुल गनी बरादर याला तालिबानचा राजकीय चेहरा म्हणून ओळखले जाते. मुल्ला उमरच्या बरोबरीने तालिबानचा तो संस्थापक आहे. दोहा येथे अनेक देशांबरोबर झालेल्या चर्चेत तालिबानच्या तुकडीत त्याचा समावेश होता. मुल्ला उमरचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. २०१० मध्ये त्याला कराचीमध्ये पकडण्यात आले होते पण २०१८ मध्ये त्याची सुटका करण्यात आली. शेर महंमद अब्बास स्तानिकझाई हा पूर्वीच्या तालिबान राजवटीत उपमंत्री होता. तालिबानची राजवट समाप्त झाल्यानंतर तो दोहा येथे स्थायिक झाला आणि तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून काम पाहू लागला. दोहा चर्चेतील तालिबान तुकडीचा तो प्रमुख सदस्य होता. तालिबानचा प्रतिनिधी म्हणून त्याने विविध देशांना भेटी दिलेल्या आहेत. अब्दुल हक्कानी दोहा वाटाघाटीच्या तालिबान तुकडीचा प्रमुख असून तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा यांचा सर्वाधिक विश्‍वासू व निकटवर्ति म्हणून ओळखला जातो. तालिबानच्या धार्मिक व बौध्दिक परिषदेचा तो प्रमुख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT