omicron sakal media
ग्लोबल

जगात ओमिक्रॉनमुळं एकही मृत्यू नाही; पण, WHO चा इशारा

कोरोनाचा नविन व्हेरिएंट सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा नविन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. आता जगभरातील ३८ देशांमध्ये याचा प्रसार झाला असून, अद्यापही या संसर्गामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

द गार्डीयन संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन (Omicron) संसर्गाची ३० लाख प्रकरणे समोर आली आहेत. युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलियातही ओमिक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. WHO ने सांगितले आहे की, ओमिक्रॉन किती संसर्गजन्य आहे, त्याने रुग्ण गंभीर होतो का, त्यावर उपचार आणि लस किती प्रभावी ठरते यावरती अभ्यास सुरु असून, त्यासाठी काही आठवड्यांचा कार्यकाळ लागू शकतो.

पुढे त्यांनी म्हटलं की, अद्याप ओमिक्रॉन (Omicron) संबंधित मृत्यूचे कोणतेही अहवाल समोर आले नाही. मात्र, या संसर्गाच्या प्रसारामुळे येत्या काही महिन्यां मध्ये युरोपात अर्ध्याहुन अधिक जणांना याची लागण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएवा म्हणाल्या, डेल्टा संसर्गाप्रमाणेच ओमिक्रॉन (Omicron) मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी केलेल्या प्राथमिक अभ्यासात, डेल्टा आणि बीटा स्ट्रेनच्या तुलनेत ओमिक्रॉन चा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता तिप्पट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT