soumya swaminathan
soumya swaminathan 
ग्लोबल

भारताची असामान्य कामगिरी; WHOला देखील करावं लागलं कौतुक

कार्तिक पुजारी

1 कोटी लस देण्याचा विक्रम साध्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण अभियानासंबंधित लोकांचे कौतुक केले

नवी दिल्ली- कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात भारताने मोठे यश मिळवलं आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून लसीकरणाचा वेग वाढत गेला, पण अद्याप देशात एका दिवशी 1 कोटी डोस देण्याचा विक्रम झाला नव्हता. तो विक्रम शुक्रवारी झाला आहे. सुरुवातीला लसीकरणाची गती कमी होती, पण आता यामध्ये वेग आल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारत सरकारचे कौतुक केले आहे. आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन Dr Soumya Swaminathan यांनी 1 कोटी लस देण्याचे लक्ष्य गाठल्याने भारताचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. (International Latest News)

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट करत म्हटलंय की, 'भारतात सरासरी 50 टक्के प्रौढ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लशीचे 62 कोटी 17 लाख 06 हजार 882 डोस देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी एका दिवसात 1 कोटी डोस देण्यात आले आहेत. या मोहीमेमध्ये सहभागी असणाऱ्या हजारो लोकांचे अभिनंदन. सार्वजनिक आरोग्य आणि व्यक्तिगत उपायांसोबत लसीकरण सर्वांचे रक्षण करेल.'

भारताच्या लसीकरणासंबंधी राष्ट्रीय सल्लागार समुहाचे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी म्हटले की, शुक्रवारी 1 कोटींपेक्षा अधिक लस देण्यात आल्या. ही भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे. आता भारताने 1.25 कोटी लशींचा टप्पा गाठण्याची आशा आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत सर्वांना लस देण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत दररोज 1 कोटी डोस नागरिकांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताला लसीकरणाची ही गती कामय ठेवावी लागणार आहे.

1 कोटी लस देण्याचा विक्रम साध्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण अभियानासंबंधित लोकांचे कौतुक केले. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, 'आज विक्रमी लसीकरण झाले. 1 कोटींचे लक्ष्य गाठणे मोठे यश आहे. जे लोक लस घेत आहेत आणि जे लोक लसीकरण अभियानामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचे अभिनंदन.' आतापर्यंत देशात कधीही 1 कोटी डोस देण्यात आल्या नव्हता. दररोज 50 लाखांच्या वरती लसीकरण होत होते. पण, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी, 1 कोटी 64 हजार 032 लोकांना लस देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT