न्यूयॉर्क : दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा (कोविड-१९) नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ आढळल्याने जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे. शास्त्रज्ञ या विषाणूला अत्यंत धोकादायक मानत आहेत. आफ्रिकन देशांमध्ये सापडलेल्या या नवीन प्रकाराबद्दल असे म्हटले जात आहे की तो लोकांना वेगाने संक्रमित करतो. अशा परिस्थितीत कोरोनावर जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमेरिकेच्या सीबीसी न्यूजनुसार, फायझरने एक निवेदन जारी केले आहे की ते सध्या ओमिक्रॉनविरुद्ध सध्याच्या लसीची चाचणी करीत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर ती प्रभावी ठरली नाही तर सध्याच्या लसीमध्ये काही बदल करून नवीन लस तयार केली जाईल. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चाचणीचे निकाल दोन आठवड्यांत समोर येतील.
दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, ओमिक्रॉनमध्ये मागील प्रकारांपेक्षा जास्त उत्परिवर्तन दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेतील साथीचे रोग विशेषज्ञ सलीम अब्दुल करीम यांनी सीबीएस न्यूजला सांगितले, नवीन प्रकारावरील विद्यमान लसी काम करीत नाहीत ही चिंतेची बाब आहे. याशिवाय त्याचा प्रसारही झपाट्याने होत आहे. हा प्रकार डेल्टा पेक्षा जास्त किंवा अधिक वेगाने पसरला मोठी समस्या निर्माण होईल.
‘व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न’ या श्रेणीमध्ये ठेवले
कोरोनाच्या नवीन प्रकाराला आधी B.1.1.529 असे नाव दिले होते. परंतु, आता जागतिक आरोग्य विभागाने ओमिक्रॉन (Omicron) असे नाव दिले आहे. तसेच या विषाणूला ‘व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न’ या श्रेणीमध्ये ठेवले आहे. याचा अर्थ कोरोना विषाणूच्या या नवीन प्रकाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
काहीही स्पष्टपणे सांगता येणार नाही
दक्षिण आफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला झाली. याशिवाय बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्येही याची ओळख पटली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जगातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या कोरोनावर सद्याची लस फायदेशीर ठरणार की नाही यावर सध्या काहीही स्पष्टपणे सांगता येणार नाही, असे अमेरिकन कंपनी फायझरने म्हटले आहे. तसेच येत्या शंभर दिवसांत यासाठी नवीन लस तयार करणार असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.