woman in Pakistan 
ग्लोबल

Pakistan: महिलेचे कपडे पाहून जमाव भडकला, महिला पोलिसाने हिम्मतीनं बाहेर काढलं; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Woman in Pakistan wearing a top with Arabic prints: पाकिस्तानमध्ये एका महिलेची मॉब लिंचिंग होता-होता वाचली आहे. एक महिला काही खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आली होती. यावेळी तिला जमावाने घेरले.

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये एका महिलेची मॉब लिंचिंग होता-होता वाचली आहे. एक महिला काही खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आली होती. यावेळी तिला जमावाने घेरले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने प्रिटेंड ड्रेस घातला होता. यावर अरबीमध्ये काही लिहिण्यात आलं होतं. लोकांना हे कुरानचे आयते असल्याचं वाटलं.(woman in Pakistan wearing a top with Arabic prints verses from the Quran mobbed by a crowd)

जमावाने महिलेवर ईशनिंदा केल्याचा आरोप करत तिला मारण्याची पूर्ण तयारी केली होती. सुदैवाने त्याठिकाणी पोलीस पोहोचले आणि मोठा अनर्थ ठरला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या सर्व घटनेमध्ये एक महिला पोलीस अधिकाऱ्याचे विशेष कौतुक होत आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याने अत्यंत हिम्मतीने जमावाला समजावून सांगितले आणि लोकांना विश्वासात घेतले. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेला जमावातून बाहेर काढलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं. व्हिडिओमध्ये दिसतंय की महिला पोलीस अधिकारी पीडित महिलेचे तोंड झाकून आणि तिला बुरखा घालून एका दुकानाच्या बाहेर काढत आहे.

पीडित महिला आपल्या पतीसोबत मार्केटमध्ये आली होती. यावेळी तिच्या अंगावरचे कपडे पाहून लोक भडकले. कपड्यांवर कुराणचे आयते असल्याचं समजून त्यांनी महिलेवर हल्ला केला. तिला तात्काळ कपडे काढण्याचा फर्मान दिला. महिला पोलिसाने दाखवलेल्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला असंच म्हणावं लागेल. महिला पोलिसाचे नाव एसएसपी सैयदा शहरबानो नकवी असे असल्याचे सांगण्यात येते. पंजाब पोलीस अधिकृतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

महिला पोलिसाचे कौतुक केले जात आहे. अनेक लोकांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचे धैर्य पाहून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. माहितीनुसार, महिलेच्या कपड्यावर कुराणमधील आयते नव्हते. त्याचा धर्माशी कोणताही संबंध नव्हता. तिच्या कपड्यावर अरबीमध्ये 'सुंदर' असं लिहिलं होतं. त्यामुळे धर्माच्या नावावर एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. दरम्यान, पीडित महिलेने पुन्हा कधीही असे कपडे न घालण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT