ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेतील कोरोना चिंताजनक

‘डब्लूएचओ’चे प्रतिपादन; विषाणूच्या नव्या प्रकाराचे ओमीक्रोन नामकरण

सकाळ वृत्तसेवा

जीनिव्हा: दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, हाँगकाँग आणि इस्राईलमध्ये आढळलेला ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा नवीन प्रकार वेगाने फैलावणारा व चिंताजनक प्रकार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) एका सल्लागार समितीने शुक्रवारी (ता.२६) जाहीर केले. ग्रीक वर्णमालेनुसार विषाणूच्या या नव्या प्रकाराला ‘ओमीक्रोन’ हे नाव संघटनेने दिले आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्रकाराच्या वर्गातील हा नवा विषाणू संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने तो चिंताजनक आहे, असे ‘डब्लूएचओ’ने म्हटले आहे. नव्या विषाणूला अटकाव घालण्यासाठी अनेक देशांनी घातलेली प्रवास बंदी अन्यायकारक असल्याची टीका दक्षिण आफ्रिकेने केली आहे.

कोरोनाचा ओमीक्रोन हा चिंताजनक प्रकार आढळला आहे. मात्र जगभर पसरलेल्या डेल्टा प्रकाराचा धोका अद्याप कायम आहे. याचा संसर्ग कमी करण्यावर भर देत दोन्ही लशी घेतलेल्या लोकांवर लक्ष ठेवले पाहिजे. समान लसीकरण होत नसल्याने लोकांचे नाहक बळी जात आहेत. सर्व देशांमधील धोकादायक वर्गातील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्‍यक आहे.

-मारिया व्हॅन खेरकोव्ह, रोगपरिस्थितिविज्ञानतज्ज्ञ, अमेरिका

ओमीक्रोन १५ व्या क्रमाकांवर

ग्रीक वर्णमालेनुसार ओमीक्रोन हे अक्षर १५ व्या क्रमाकांवर आहे. जगभरात ठिकठिकाणी कोरोनाचे अनेक प्रकार आले आहेत. ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा १५ वा प्रकार आहे. यामुळेच ‘डब्लूएचओ’ने त्याला ‘ओमीक्रोन’ नाव दिले आहे. ‘सार्स-सीओव्ही-२’च्या मुख्य प्रकारांसाठी उच्चारण्यास सहज, सोपे व लक्षात राहणारी ग्रीक वर्णमालेतील नावे आरोग्य संघटनेने ३१ मे रोजी जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटील पोलिसांच्या रडारवर का आली? नेमकं प्रकरण काय? तपासाची चक्र फिरणार!

IND vs WI 1st Test Live: भारताचं रात्री अचानक ठरलं, जाहीर केला अचंबित करणारा निर्णय! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ड्रामा

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत घेणार बैठक

Italy Road Accident : पर्यटनासाठी गेलेल्या अख्तर कुटुंबावर काळाचा घाला; इटलीतील भीषण अपघातात नागपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू, मुलगी गंभीर

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

SCROLL FOR NEXT