Goa Assembly election updates | Goa CM News Team eSakal
Goa Assembly Election

अखेर दिल्लीत ठरलं! गोव्याच्या सत्तास्थापनेचा तिढा आज सुटणार

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळूनसुद्धा लांबलेल्या शपथविधी

सकाळ वृत्तसेवा

पणजी : विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळूनसुद्धा लांबलेल्या शपथविधी सोहळ्यामागे पक्षात सारे काही ठीक आहे, अशी स्थिती नाही. शनिवारी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांना गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलावून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सावंत हे रविवारी पहाटे गोव्यात परतले. विश्वजीत राणे यांनीही दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलणी केल्यानंतर ते सायंकाळी उशिरा मुंबईत दाखल झाले.

रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बैठकीत गोवा आणि उत्तराखंड राज्यांमधील नेतृत्वाबाबत चर्चा केली. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील सत्तास्थापनेविषयी उपस्थित केलेल्या मुद्यांवर या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. येथील सत्ता प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येईल, असा पुनरुच्चारही या बैठकीत झाला. भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीने नियुक्त केलेले कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन उद्या (सोमवारी) गोव्यात दाखल होत आहेत.

भाजपने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शपथविधीची तयारी सुरू केली असून हा सोहळा तितकाच दिमाखदार पद्धतीने करण्याचा भाजपचा प्रयत्न असून यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पूर्वनियोजित कामामुळे या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT