goa cm Pramod Sawant announces support of 3 independent candidates claims majority rak94
goa cm Pramod Sawant announces support of 3 independent candidates claims majority rak94 
Goa Assembly Election

गोव्यात प्रमोद सावंत यांना ३ अपक्षांचा पाठिंबा; भाजपचा बहुमताचा दावा

सकाळ डिजिटल टीम

गोवा विधानसभा निवडणुकी निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने गोव्याच्या निवडणुकीत (Goa Election Result 2022) आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंतच्या समोर निकालानुसार बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 21 जागांच्या आकड्यापेक्षा पक्ष सध्या थोडा मागे दिसत असला तरी गोवा भाजपने आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे.

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अँटोनियो वास, चंद्रकांत शेट्ये आणि अॅलेक्स रेजिनाल्ड या तीन अपक्षांचा पाठिंबा असल्याचे जाहीर करून बहुमताचा दावा केला आहे. (Goa Assembly Election Results Updates)

गोव्यातील 40 जागांवर आत्तापर्यंत आलेल्या निकालांनुसार भाजप सध्या 19 जागांवर (+6) आघाडीवर आहे. काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर असून तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष प्रत्येकी तीन जागांवर आघाडीवर आहेत, तर इतर तीन जागांवर आघाडीवर आहेत.

सावंत यांनी कु वर पोस्ट करत भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल गोव्याच्या जनतेचे आभार मानले

मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार प्रमोद सावंत सांकेलीम जागेवर सुमारे 350 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपबद्दल बोलायचे झाले तर 2017 च्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने गोव्यात 40 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, परंतु 13 जागा जिंकूनही, भाजपने लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT