Goa Election Result 2022 BJP Husband Wife MLA Pair In Goa Dynasty Politics  esakal
Goa Assembly Election

Goa Election Result: दोन जोड्या चार आमदार; गोव्यात भाजपची 'घराणेशाही'

सकाळ डिजिटल टीम

पणजी : गोवा निवडणुकीत (Goa Election Result 2022) भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमताच्या अगदी जवळ पोहचला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजप 18 जागांवर विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांचा सत्तेचा मार्ग मोकळा होताना दिसतो आहे. गोव्यात काही उत्पल पर्रिकर लोबो, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या लढतींकडे लोकांचे लक्ष होते. याचबरोबर भाजपमधील दोन पती-पत्नींच्या जोड्या (BJP Husband Wife MLA Pair In Goa) देखील रिंगणात होत्या. त्यांच्या निकालाबाबतही लोकांमध्ये उत्सुकता होती.

दरम्यान, भाजपचे पणजीमधील विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात (Atanasio Monserrate) यांनी बंडखोर उत्पल पर्रिकर यांचा पराभव करत आपला गड राखला. याचबरोबर त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात (Jeniffer Monserrate) या देखील तोलैगोवा मतदार संघातून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपची दुसरी पतीपत्नी जोडी विश्वजीत राणे (Vishwajit Rane) आणि दिव्या राणे (Deviya Vishwajit Rane) हे देखील निवडून आले आहे. त्यामुळे घराणेशाहीचा तिटकारा असलेल्या भाजपमध्येच दोन पती-पत्नींच्या जोड्यांनी भाजपच्या आमदारांचा आकडा हा दणक्याच चारने वाढवला आहे.

40 आमदारांच्या गोवा विधानसभेत बहुमताचा आकडा हा 21 आहे. त्यामुळे बहुमतासाठी एक एक आमदार अत्यंत महत्वाचा ठरतो. अशा परिस्थिती भाजपची या दोन पती पत्नींच्या जोड्या चांगलाच भाव खाणार असं दिसतंय. तसेही विश्वजीत राणे यांना मुख्यमंत्रीपद खुणावत असून ते प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाला आव्हान देण्याची शक्याताही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT