Dhule Bus Stand : धुळ्यातील एसटी प्रवासाचा कायापालट! चार स्थानकांचा 'एअरपोर्ट' सारखा विकास, ९० नवीन बसेस दाखल

Major Infrastructure Boost for MSRTC in Dhule District : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर बसस्थानकांचा अत्याधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार असून प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
MSRTC in Dhule District

MSRTC in Dhule District

sakal

Updated on

धुळे: जिल्ह्यातील प्रवाशांचा एसटी प्रवास आता अधिक सुखकर आणि दर्जेदार होणार आहे. जिल्ह्यातील दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर या चार प्रमुख बसस्थानकांचा अत्याधुनिक धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यासाठी तातडीने ९० नवीन बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पणनमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्राला आणखी गती मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com