Kids esakal
health-fitness-wellness

Children's Day : तुमच्या मुलाला डिप्रेशन आलंय का? या गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ डिजिटल टीम

लहान मुले निरागस असतात. त्यांना कोणतेही ताणतणाव नसतात, असं समजलं जातं. पण कोरोना काळात सगळ्यांना समस्यांनी ग्रासलं आहे. त्यातून लहान मुलेही सुटली नाहीत. त्यांच्या जीवनात अचानक बदल झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मन आणि शरीरावर झाला. त्यामुळे सध्या अनेक मुलं चिंताग्रस्त आणि डिप्रेशनमध्ये असल्याचे मानसशास्त्रज्ञ सांगतात.

असं का होतं?

साथीचे आजार, नैसर्गिक आपत्ती, कोणताही गंभीर आजार वा अपघात झाल्यानंतर काही वर्षे लोटली तरी त्याचा सामना करणारे लोक त्या मनावर कोरल्या गेलेल्या आघातातून बाहेर येऊ शकत नाहीत. या मनःस्थितीला पीटीएसडी म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. कोरोना काळात अनेक नकारात्मक बातम्या कानावर येत होत्या. त्याचा परिणाम मुलांवरही झाल्याने त्यांच्यात अशी लक्षणे दिसत आहेत. कोरोनाचा फटका संपूर्ण कुटुंबाला बसल्याच्या अनेक घटना घडल्या. काहींनी जवळची माणसे गमावल्याच्या घटनाही घडल्या. अनेक मुलांच्या आई किंवा वडिलांचे निधन झाले. त्यामुळे ती आणखीनच घाबरली. अशा कारणांमुळे मुलांमध्ये फोबिया, तणाव, नैराश्य यासारखी लक्षणे आढळून येत आहेत. तसेच संसर्गाच्या भितीमुळे काही मुले OCD (Obsessive Compulsive Disorder) या प्रोब्लेमचा सामना करत आहेत. अशी समस्या असलेली मुले सारखी हात धुतात तसेच इतरांशी संवाद साधण्यात त्यांना अडचणी येतात.

यावर उपाय काय?

कोरोनाआधी मुले शाळेत जायची, तिथल्या मित्रांबरोबर खेळायची. शिवाय सोसायटीतल्या मित्रांबरोबर दररोज खेळायची. यामुळे मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासात चांगला बदल होतो. पण कोरोनामुळे आता घराबाहेर पडताना मास्क घालावा लागतो. तो घालायचा त्रास म्हणा किंवा वैताग येत असल्याने मुलांना आता मैदानात जायला फारसे आवडत नाही. पालक ऑफिस असल्याने मुलांना फार वेळ देऊ शकत नाहीत. नववी- दहावीच्या शाळा सुरू झाल्या तरी मुलांना भविष्याची काळजी वाटते आहे. मात्र आता पालकांनीच मुलांचा उत्साह कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घेतल्यास मुलांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

kids

WHO च्या गाईडलाईन्स
-मुलांबरोबर संवाद साधण्यासाठी, खेळण्यासाठी वेळ काढा

-घरातल्या काही कार्यात त्यांना सामील करून घ्या. उदा- बागकाम, साफसफाई, एखादा पदार्थ करणे, अशा काही एक्टीव्हिटिजमुळे मुलांचा उत्साह वाढेल.

- वायरल व्हिडिओ आणि नकारात्मक गोष्टींबाबत मुलांसमोर चर्चा करू नका.

- मुलांच्या जवळच्या मित्रांना घरी बोलावून छोटीशी पार्टी आयोजित करा. यामुळे घरातले वातावरण पॉझिटिव्ह राहण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT