Depression Depression
health-fitness-wellness

नैराश्य हा बरा होणारा आजार; गरज फक्त रुग्णाला समजून घेण्याची

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात नैराश्य किंवा उदासीनता बऱ्याच प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. दहा ते २५ टक्के लोकांना डिप्रेशन म्हणजेच उदासीनतेने ग्रासलेले आहे. योग्य उपचाराने नैराश्य पूर्णपणे बरा होऊ शकतो, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी दिली.

जीवघेणी स्पर्धा, आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध, दुरावा, स्वतःला कमी लेखणे, नापास होणे, असफलता, धंद्यामध्ये नुकसान, पती-पत्नीचे न पटणे, घटस्फोट, मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार अशी बरीच कारणे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य या आजाराची असू शकतात. दोन आठवडे सतत एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसली तर त्याला डिप्रेशन हा आजार झाला आहे, असे समजता येईल. अशावेळी रुग्णाला समजून घेण्याची आणि योग्य उपचाराची आवश्यकता असते. सर्वांमध्येच सर्व लक्षणे असतीलच असेही नाही. नैराश्य कोणत्याही वयामध्ये होऊ शकते. परंतु, सुरुवात बहुतेक वयाच्या ३० वर्षांच्या आसपास होते. लहान मुलांमध्येही नैराश्य हा आजार दिसतो.

डिप्रेशनबरोबर डायबेटिस, रक्तदाब, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता अधिक असते. आई-वडिलांना डिप्रेशनचा आजार असेल तर मुलांनाही तो होण्याचा धोका जास्त असतो. नैराश्याचा आजार बरा होऊ शकतो. औषधे, मानसोपचार केल्यामुळे हा आजार ठीक होतो. आजार गंभीर असेल किंवा आत्महत्येचा धोका असेल तर शॉक ट्रिटमेंटची आवश्यकता पडू शकते. नैराश्य हा आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे. पेशंटला समजून घेण्याची आणि योग्य उपचाराची आवश्यकता आहे.
- डॉ. श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ

काय आहेत लक्षणे?

  • सतत उदास किंवा चिंतेत राहणे

  • निराश वाटणे

  • आपले कसे होईल अशी चिंता वाटणे

  • चिडचिडेपणा

  • अपराधीपणाची भावना

  • आपले कोणीच नाही असे वाटणे

  • कशातही रस किंवा गोडी न वाटणे

  • थकवा किंवा ऊर्जा कमी वाटणे

  • हळूहळू बोलणे

  • बैचेनी वाटणे

  • एका ठिकाणी बसविले न जाणे

  • कामात लक्ष न लागणे

  • लवकर निर्णय न घेता येणे

  • झोप न लागणे

  • सकाळी लवकर जाग येणे

  • जास्त झोप लागणे

  • आत्महत्येचे विचार येणे

  • आत्महत्येचा प्रयत्न करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

IPL 2026 : हार्दिक पांड्या रायपूरला पोहोचला, पण Mumbai Indians च्या सराव सत्रात भाग नाही घेतला! सूर्यकुमारबाबत महत्त्वाचे अपडेट्स...

Latest Marathi News Live Update : उष्माघाताला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, खडसेंची मागणी

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT