कर्करोग sakal
health-fitness-wellness

कर्करोगाचे निदान झाले; पण उपचार कोण करणार?

जागतिक कर्करोग दिन; शासकीय रुग्णालयात निदान पण, उपचारासाठी यंत्रणा नाही

शिवचरण वावळे

नांदेड : देशभरात कोरोनाची लाट थोपवण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करुन जिल्हाच नव्हे तर अगदी गाव पातळीवर अत्यावश्‍यक उपचार यंत्रणा उभारली जात आहे. मात्र, कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला थोपविण्यासाठी जिल्हा पातळीवर वैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय रुग्णालयात उपचार यंत्रणा उभारली गेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

ता. चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील कर्करोग आजार व त्यावर केल्या जाणाऱ्या उपचारासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात कर्करोगावर उपचार करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. शासकीय रुग्णालयात केवळ कर्करोग आजाराची तपासणी या पलीकडे काही होत नाही. त्यामुळे एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीस कर्करोगाचे निदान झाल्यास त्या रुग्णास औरंगाबाद, हैदराबाद, पुणे, मुंबई, बार्शी किंवा मोठी शहरे गाठावी लागतात.

दुर्देवाने छोट्या कुटुंबातील प्रमुखाला कर्करोगाचे निदान झाल्यास त्यास खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. अशा रुग्णांसाठी नांदेड शहरातील मोनार्क हॉस्पीटल सध्या कार्यरत असून आशेचा किरण ठरत आहे. या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कर्करोगाचा समावेश करण्यात आल्यापासून रुग्ण व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत आहे.

दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने श्री. गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय शंभरवरुन तीनशे खाटांचे होणार आहे. हे रुग्णालय तीनशे खाटांचे झाल्यास त्यामध्ये किमोथेरअरपी, रेडीयशन ह्या उपचार पद्धतीने सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारी...

मागील दोन वर्षात विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील मुख कर्करोगाचे ३०, स्तन कर्करोगाचे सहा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे ११ असे एकुण ४७ रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे मागील वर्षभरात मोनार्क हॉस्पीटलमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंत किमोथेअरपी - चार हजार ५७८, रेडीएशन थेरपी - ९०६ तर १६१ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून वर्षभरात पाच हजार ६४५ रुग्णांची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT