Exercise will keep fit and fine
Exercise will keep fit and fine 
health-fitness-wellness

व्यायामाचे 'हे' फन्डे ठेवतील तुम्हाला फिट अँड फाईन...!

सुयोग घाटगे

कोल्हापूर - निव्वळ बलदंड शरीर कमावणे, पिळदार शरीर असणे यासाठीच व्यायाम करावा हा प्रघात सध्या बदलेला आहे. या ऐवजी आपण फिट अँड फाईन असावे यासाठी आवश्‍यक असणाऱ्या व्यायाम प्रकाराकडे अधिकाधिक कल असल्याचे चित्र सध्या कोल्हापूरमध्ये दिसत आहे. या मुळेच येथील जिमही अद्ययावत आणि सुसज्ज होत आहेत. नेहमी एका बंदिस्त खोलीत काही वजनेटेबल आणि डंबेल्स आणि घामाचा वास असे काहीसे असणारे चित्र सध्या बदलेले असून, सुसज्ज इंटिरियर, आधुनिक मशीनरी, सौम्य आणि उत्सवर्धक संगीत, योग्य प्रमाणातील वजने, मेडिकल किट या सह पर्सनल ट्रेनर या सगळ्यांमुळे जिम अविभाज्य घटक बनत चालली आहे. पारंपरिक व्यायाम हा शरीर बलदंड करण्यासाठी केला जात असे. यामध्ये अनेक बदल होत सध्या फिटनेससाठी व्यायाम हा ट्रेंड रुजतो आहे. अशाच फिटनेस ट्रेंड्‌सविषयी.

 ॲक्वा एरोबिक्‍स

या प्रकारच्या व्यायामामध्ये पोहणं आणि एरोबिक्‍स यांचं मिश्रण आहे. संपूर्णतः पाण्यात केले जाणारे व्यायामप्रकार असल्यामुळे अजिबात दमायला होत नाही. शिवाय इंज्युरीचे प्रमाणही अत्यल्प आहे. या व्यायाम प्रकाराच्या सातत्यपूर्ण सरावामुळे तग धरून राहण्याची क्षमता वाढते. फ्लोट्‌स, पॅडल्स अशा नवनवीन साधनांच्या मदतीनं व्यायाम अधिक आरामदायी होतो. पाण्यात केल्या जाणाऱ्या ॲक्वा स्ट्रेन्थ, ॲक्वा पिलेट्‌स, ॲक्वा स्ट्रेच अशा नाविन्यपूर्ण प्रकारांमुळे लवचिकता वाढण्यास मदत होते. शिवाय वेटलॉससाठी याचा सर्वाधिक वापर होत आहे. सध्या योगामध्ये आधुनिकीकरण झाले असून, हॉट योग, योग एरोबिक्‍स, कॅंडललिट योग ही आणि अशी अनेक आधुनिक रूपं योगाने धारण केली आहेत. थेट मनाशी साधला जाणारा संवाद हा योगचा सगळ्यात मोठा फायदा आहे. शरीराबरोबरच मनाची तंदुरुस्ती यातून साधली जात आहे.

 स्पिनिंगची कमाल

हृदयाला उत्तम व्यायाम देणारा व्यायाम म्हणून हा प्रकार प्रचलित आहे. या व्यायामुळे पायातली ताकद वाढण्यास मदत होते. न्यू कटिंग एज टेक्‍नॉलॉजीमुळे हा प्रकार सायकलिंगच्या पलीकडे प्रसिद्ध झाला आहे. नावीन्यपूर्ण लिनिंग बाइक्‍सच्या उपलब्धतेमुळे हे वर्कआऊट अधिक आव्हानात्मक झालं आहे. इनडोअर सायकलमधील वाढलेलं तंत्रज्ञान आणि गरजेनुसार असणारे सेटिंग्समुळे शरीराला पूरक असा व्यायाम यातून साधने शक्‍य होत आहे.

 अरोबिक्‍स डान्स

व्यायाम आणि डान्स या दोन्हीचं मिश्र स्वरूप म्हणून अरेबिक्‍स डान्स हा प्रकार प्रचलित झाला आहे. संगीताच्या तालाबरोबर हा प्रकार करताना एक वेगळीच मजा येते. तसेच संपूर्ण शरीराच्या हालचालीमुळे फॅट बर्निंगसाठी याचा सर्वाधिक फायदा होत आहे. झुंबा, भांगडा, शिमी, आरो जम्प हे प्रकार सध्या सर्वाधिक ट्रेंडिंग आहेत. हा प्रकार अधिक उत्तेजना वाढवणारा असल्यामुळे हा करताना कंटाळा येत नाही.

 बूट कॅम्प

हा प्रकार म्हणजे आर्मी ट्रेनिंगचं मिनी स्वरुप. स्क्वॅट्‌स, सीट अप्स, स्प्रिंटिंग अशा व्यायमांचा यात समावेश असतो. शरीराची क्षमता, ताकदआणि मसल साईज वाढवण्यासाठी हा प्रकार सर्वोत्तम आहे. विशिष्ट ध्येयासाठी व्यायाम करायचा असल्यास हे प्रकार केले जातात. खेळाडूंसाठीही या व्यायामाचे विशेष महत्व आहे.

 पिलेट्‌स

पोट आणि पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी या प्रकारचा सर्रास वापर होऊ लागला आहे. शरीर समतल ठेऊन शरीराचा समतोल साधने हाच या प्रकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. शरीराचा तोल आणि अवयवांचा परस्पर समन्वय साधण्यासाठी पिलेट्‌स हा व्यायाम प्रकार केला जातो. सध्या या प्रकारात बोसू बॉल्स, स्टेबिलिटी बॉल्स, वोबो बॉल्स यांचा वापर केला जातो. तसेच मशीन प्लॅटफॉर्म वर स्प्रिंग अथवा रबर टेन्शन पट्टी वापरली जाते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT