five ingredients add to green tea for better benefit nagpur news 
health-fitness-wellness

'या' पाच गोष्टी वापरा अन् 'ग्रीन टी'चा दुप्पट फायदा मिळवा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : धावपळीचे जीवन, बदलता आहार, बदलती जीवनशैली यामुळे प्रत्येकजण अनेक आजारांचा सामना करत असतात. वेळेवर जेवण न केल्याने अनेक आजार होतात. त्यामुळे शरीर फीट ठेवण्यासाठी अनेकजण ग्रीन टीचा सहारा घेत असतात. त्यामुळे ग्रीन टी सर्वात लोकप्रिय बनले आहे. यामध्ये ईजीसी सारखे अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासोबत त्वचा तजेलदार होण्यासाठी देखील ग्रीन टी चा वापर होतो. मात्र, यामध्ये आणखी काही साहित्य टाकले तर ग्रीन टी आणखी पोषक आणि स्वादिष्ट बनेल.

मध -
ग्रीन टी प्यायला ज्यांना आवडत नाही, त्यांनी मध घालावे. मध ग्रीन टी मध्ये नॅचरल शुगरचे काम करते. तसेच यामध्ये असणारे व्हिटामीन आणि खनिजे हेल्टी राहण्यास मदत करतात. तसेच त्वचा देखील चमकदार बनवण्यात मदत होते. 

लिंबू -
लिंबामध्ये व्हिटामीन सी असते. त्यामुळे कोरोनाच्या काळात लिंबाचे सेवन अधिक गुणकारी ठरते. तसेच तुम्ही ग्रीन टीमध्ये लिंबू घालून पीत असाल तर ते शरीरासाठी फायदेशीर ठरते. तसेच ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस घातल्याने अँटीअॅक्सिड्ट वाढण्यास मदत होते. 

आले -
आले आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. मात्र, हेच ज्यावेळी ग्रीन टी मध्ये टाकून पिल्यास त्याची गुणवत्ती वाढते. ग्रीन टी आणि आलं सोबत प्यायल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आपला ताण-तणाव देखील कमी होण्यास मदत होते. तसेच कँसर सारख्या आजारांसोबत लढण्यासाठी मदत होते. तसेच मधुमेह, मासिक पाळी आणि अस्थमासाठी देखील आलं आणि ग्रीन टी पिणे चांगले असते. 

पुदीना आणि दालचिनी -
पुदीना आपली पाचनशक्ती वाढवत असते. तसेच भुखेला देखील कंट्रोल करण्यास मदत करतो. तसेच दालचिनी जवन नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे ग्रीन टीमध्ये पुदीना आणि दालचिनी घालून पिणे हे शरीरासाठी चांगले असते. 

स्टीवियाचे पानं -
स्टीविया म्हणजे गोड तुळशीचे पाने. ते घालुन ग्रीन टी प्यायल्यास वजनासोबतच कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित देखील राहते. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT