hair.jpg 
health-fitness-wellness

ऋतू बदलतोय... पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

सकाळवृत्तसेवा

नागपूर : पावसात कामानिमित्त बाहेर जाताना केसांचे सौंदर्य बरेचदा बिघडते. वेगवेगळ्या ऋतू आणि हवामान बदलाचा केसांवरही परिणाम होतो. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्य आणि केसांची काळजी घेण्याची पद्धत प्रत्येक तरुणीची बदलते. पावसाळ्यात केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते. अशावेळी केसांचा पोत, सौंदर्य पावसाळ्यात कशा प्रकारे उत्तम राहील याकरिता काही टिप्स 

- पावसाळा सुरू झाल्यास शक्‍यतो वेगवेगळ्या हेअर स्टाइल करणे टाळावे. जरी हेअर स्टाइल करायची असेल तर हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर पावसाळ्यात करणे टाळा. केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. आठवड्यातून दोन वेळा केस धुऊन एकदा कंडिशनर लावावे. 
- पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनिंग करणे तसेच सतत आयनिंग करणे टाळावे. पावसाळ्यात केस ओले झाले असल्यास मोठ्या दातांचा कंगवा किंवा लाकडी कंगवा वापरा. त्यामुळे केस जास्त तुटणार नाहीत. 
- केस भिजले असल्यास लगेच बांधू नयेत. यामुळे फंगल इन्फेक्‍शन होऊ शकते. पावसाळ्यातील प्रवासात केस भिजले असेल तर लगेच स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. 
- पावसाळ्यात केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा. जेणेकरून जास्त केस तुटणार नाही. 
- पावसाळ्यात "ई' जीवनसत्त्व असलेला आहार घ्या. त्यामुळे तुमचे केस मजबूत राहतील. 
- भिजलेले केस बांधून ठेवू नका. त्यामुळे फंगल इन्फेक्‍शन होऊन केसात खाज येऊ शकते. त्यामुळे ओले केस कोरडे करून मग बांधा. 
- पावसाच्या पाण्यात केस भिजले तरी लगेच धुऊन घ्या. तसेच केस धुतल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कंडिशन करावेत. 
- कामाशिवाय पावसात बाहेर पडणे टाळा. पावसात भिजल्यानंतर केस माईल्ड क्‍लिंजरने स्वच्छ धुवावेत. तसेच त्यांना कंडिशनर लावावे. 

सुंदर केसांसाठी घरगुती उपाय

1. रात्री एक चमचा मेथी भिजवून ठेवा. सकाळी ही भिजवलेली मेथीची पेस्ट तयार करा आणि त्यात दही आणि लिंबाचा रस मिश्रित करा. ही पेस्ट 10 ते 15 मिनिटांसाठी केसांवर लावा. नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करा आणि केसांना टॉवेलने बांधून ठेवा. हेही लक्षात ठेवा की, भिजलेल्या केसांवर कंगवा फिरवू नका. 
2. चहा पावडरच्या पाण्यात लिंबाचा रस मिश्रित करून केसांवर हे पाणी टाका. याने केसांना एक नवी चमक मिळेल, सोबतच केस मुलायम होतील. तसेच याने केसगळतीची समस्या देखील दूर होईल. 
3. केसांची हरवलेली चमक मिळवण्यासाठी मधाचा वापर करा. याने ना केवळ केसांना चमक मिळेल, तर केस मुलायम देखील मिळेल. मधात केसांसाठी आवश्‍यक असणारे पोषक तत्त्व असतात. 
4. आठवड्यातून कमीत कमी एक वेळा केसांना स्टीम द्या. स्टीम घेतल्यानंतर केस कापडाने बांधून ठेवा. तसेच केस मोकळे केल्यावर लगेच कंगवा फिरवू नका. केस कोरडे झाल्यावर त्यात कंगवा फिरवा. 
5. केसांना ऍलोवेराचा अनेक दृष्टीने फायदा होतो. याने केसांचा रखरखीतपणा दूर करून केसांना मुलायम केलं जातं. यातील अँटी-ऑक्‍सिडेंट आणि व्हिटॅमिन केसांना पोषण देण्याचं काम करतात. 

केवळ नारळाचेच तेल
पावसाळ्यात अनेकदा आपल डोकं भिजल्याने डोक्‍यात खाज येणे, कोंडा होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. यापासून सुटका करायची असेल तर केस शक्‍यतो कोरडे ठेवावेत. त्यासोबतच केसांना केवळ नारळाचेच तेल लावावे. तसेच कोंडा जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर कांद्याचा रस आठवड्यातून दोन वेळा लावावा. 
तसेच या दिवसात सूर्यप्रकाश कमी राहत असल्याने केस लवकर कोरडेही होत नाहीत. त्यासाठी पाण्यासोबत योग्य अँन्टी-बॅक्‍टेरियल किंवा अँन्टीफंगल शॅम्पूचा वापर करावा. याने इंफेक्‍शन दूर राहण्यास मदत होते. 
- संगीता चव्हाण, ब्युटीशीयन, नागपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT