sakal
sakal 
health-fitness-wellness

आरोग्य विमा : सहभागी व्हा देशातील पाहिल्यावाहिल्या 'युनिक' सर्वेक्षणात आणि नोंदवा तुमचा अनुभव !

सकाळ वृत्तसेवा

कोविड काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य विमा योजनांचा अनुभव पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मात्र काहीसा त्रासदायक ठरत आहे.

कोविड काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य विमा योजनांचा अनुभव पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मात्र काहीसा त्रासदायक ठरत आहे. एकीकडे वाढत्या हॉस्पिटलायझेशनमुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे क्लेम मिळविताना होणारा विलंब आणि क्लेमची पूर्ण रक्कम न मिळणे यामुळे विमाधारकांना मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विमाधारकांचे हक्क आणि अनुभव विमा कंपन्यांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने सकाळ माध्यम समूह एक सर्वेक्षण करत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन 'सकाळ' करत आहे.

मार्च २०१९ पासून संपूर्ण देशाला वेठीस धरलेल्या कोविडमुळे अनेकांच्या उत्पन्नाला ब्रेक लागला असतानाच कोविड उपचारादरम्यान येणारा भलामोठा खर्च भागविताना सर्वसामान्यांच्या अक्षरशः नाकीनऊ येऊ लागले. अशावेळी आरोग्य विमा योजना देवदूतासारख्या धावून आल्या आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेत विमा नियामक संस्था आयआरडीएच्या मार्गदर्शनाखाली आलेली कोरोना कवच पॉलिसी आणि नेहमीच्या आरोग्य विमा योजनांअंतर्गत विमा कंपन्यांनी क्लेम (दावे) अतिशय वेगाने पूर्णत्वास नेले. त्यामुळे विमाधारकांना कोविडचा सामना करणे सुसह्य झाले.

पहिल्या लाटेदरम्यान विम्याचे महत्त्व लक्षात येऊन विमा घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. विशेषकरून हेल्थ आणि टर्म इन्श्युरन्स घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, वेगाने आलेल्या दुसऱ्या लाटेत हॉस्पिटलायझेशन वाढून क्लेमची संख्या वाढलेली असताना 'वर्क फ्रॉम होम' असलेल्या विमा कंपन्यांना दावे निकाली काढण्यात विलंब होत आहे. परिणामी सर्वसामान्य विमाधारकाला मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर क्लेम निकाली काढताना होणाऱ्या विलंबाचे नेमके कारण जाणून घेऊन सर्वसामान्यांचा आवाज विमा कंपन्यांपर्यंत पोचवून त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी विमाधारक आणि विमा कंपनी दरम्यान दुवा साधण्याचे काम 'सकाळ' करत आहे.

सर्वेक्षणात सहभागी का व्हावे

सर्वेक्षणाच्या माध्यमातून परिपूर्ण संशोधन होऊन योग्य निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी आणि विमा कंपनीकडून चांगली ग्राहक सेवा मिळावी म्हणून पॉलिसीधारकांबरोबरच नव्याने पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्यांनी देखील सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन 'सकाळ' करत आहे.

सकाळ आयोजित आरोग्य विमा सर्वेक्षणात रुची दाखविल्याबद्दल धन्यवाद. कृपया सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी...

या सर्वेक्षणात सामील होण्यासाठी ७३५०८ ७३५०८ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. मिस्ड कॉल नोंदविल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक लिंक येईल. या लिंकवर तुमचे अनुभव जाणून घेण्यासाठी काही प्रश्न आहेत. विमाधारकांनी या प्रश्नांची उत्तरे नोंदविल्यानंतर 'सकाळ' विमा कंपन्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा करेल जेणेकरून दावे निकाली निघताना होणारा विलंब कमी होण्यात किंवा किंवा ही प्रक्रिया समजून घेण्यात मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT