Vitamin E Deficiency
Vitamin E Deficiency google
health-fitness-wellness

Vitamin E Deficiency: जीवनसत्व 'ई'ची कमतरता असेल तर उद्भवू शकतात 'या' समस्या

सकाळ डिजिटल टीम

Vitamin E Deficiency: शरीरातील जीवनसत्वाचे (vitamin) प्रमाण कमी झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. जीवनसत्वे सी, डी आणि बी च्या कमतरतेमुळे लोक सर्वात जास्त चिंतेत असतात. मात्र, याशिवायही काही जीवनसत्वे आपल्या शरीरासाठी महत्वाची असतात.

त्यात जीवनसत्व-ई' (vitamin E) चा समावेश होतो. मात्र, अनेकजण या जीवनसत्वाकडे लक्ष देत नाहीत. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रोगप्रतिकारशक्ती कमी होणे -

जीवनसत्व ई ची कमतरता असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. त्यामुळे वारंवार संसर्ग होऊन आजार होतात.

त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुदृढ ठेवायची असेल तर जीवनसत्व ई चे मोठ्या प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. शरीरात या जीवनसत्वाची कमतरता जाणवल्यास सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तसेच श्वसनाचे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.

डोळ्यांची समस्या -

निरोगी डोळ्यांच्या ऊतींना धोकादायक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून डोळ्यांची मुक्तता करण्यात जीवनसत्व ई महत्वाची भूमिका बजावते. तसेच डोळ्यांसंबंधी मोतीबिंदूसारखे इतर आजारांचा धोका देखील जीवनसत्व ई मुळे कमी होतो.

जखम लवकर भरण्यास मदत -

जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे त्वचेच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. त्वचेवर एखादी जखम झाली असेल तर ती लवकर बरी होत नाही. मात्र, शरीरात गरजेनुसार जीवनसत्व ईची मात्रा असेल तर ही जखमी लवकर बरी होण्यास मदत होते. मात्र, यावर अभ्यास करण्याची गरज आहे.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या -

क्रोहन आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये जीवनसत्व ई ची कमतरता असते. मात्र, क्रोहन आजार आणि जीवनसत्व ई चा थेट संबंध नाही. शरीरात जे उपयुक्त नसलेले फॅट जमा होते त्यासोबत व्हीटॅमीन ई चा संबंध असतो. या जीवनसत्वाची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवल्यास उलट्या, पोटावर सूजन येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT