marichyasana yoga sakal
health-fitness-wellness

योग- जीवन : अनुकूल आणि योग्य

साधनेत प्रगती साधताना अनेक विघ्ने व त्यांची लक्षणे साधकाच्या प्रगतीत खिळ घालीत असतात. त्यांच्या निरसनासाठी पतंजलींनी अनेक ध्यान-पद्धती सांगितलेल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

साधनेत प्रगती साधताना अनेक विघ्ने व त्यांची लक्षणे साधकाच्या प्रगतीत खिळ घालीत असतात. त्यांच्या निरसनासाठी पतंजलींनी अनेक ध्यान-पद्धती सांगितलेल्या आहेत.

- किशोर विष्णू आंबेकर, अय्यंगार योग शिक्षक

साधनेत प्रगती साधताना अनेक विघ्ने व त्यांची लक्षणे साधकाच्या प्रगतीत खिळ घालीत असतात. त्यांच्या निरसनासाठी पतंजलींनी अनेक ध्यान-पद्धती सांगितलेल्या आहेत. (समाधिपाद सूत्र ३३ ते ३९) यातील शेवटच्या सूत्रात पतंजली महामुनी म्हणतात-

यथाभिमतध्यानाद्वा

केवळ आवडते आहे म्हणून नाही, तर ध्यानासाठी अनुकूल, योग्य, पवित्र, शुभ आणि आध्यात्मिक उन्नती घडविणाऱ्या कोणत्याही आलंबनावर ध्यानाभ्यास केल्याने चित्त स्थिर होते. आपापल्या आवडीप्रमाणे कोणतीही देवता, चिन्ह, यंत्र, मूर्ती की ज्यांना आपण देवासमान मानतो; आलंबन, आधार म्हणून स्वीकारता येते. फक्त अट एकच आहे की ते निर्विवादपणे पवित्र, शुभ असायला पाहिजे.

यावरून हे लक्षात येते, की पतंजलींचा दृष्टिकोन किती उदार, सर्वसमावेशक आणि व्यापक असा आहे. जेणेकरून सर्वांना आध्यात्मिक ध्येय गाठणे शक्य होईल.

सर्वांत जास्त आनंददायी म्हणजे आपले स्वतःचे अस्तित्व हेच आहे.तो अंतरात्मा हेच ते आलंबन आहे .जो आत्मा जिवात्म्यापासून परमात्म्यापर्यंत व्यापून राहिलेला आहे त्याचा शोध घ्या असे पतंजली म्हणतात.

योगसूत्रांचे भाष्यकार व्यास म्हणतात, ‘आवडीच्या कोणत्याही आलंबनावर ध्यानाभ्यास करून चित्त स्थिर झाल्यानंतर इतर कोणत्याही आलंबनावर ध्यान करता येते.’

अशा प्रकारे ध्यानसाधनेची पूर्वतयारी झाल्यानंतर, साधकाला अत्यंत स्थूल आलंबनापासून अत्यंत सूक्ष्म आलंबनावर ध्याना भ्यास करता येतो. इष्टदेवतेचे चिंतन, मनन व ध्यान करता येते.

प्रसिद्ध विष्णू-ध्यानाचा श्लोक आहे :

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं l

विश्वाधारं गगनसदृश्यं मेघवर्णं शुभांगम् ll

लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् l

वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैक नाथम् ll

अय्यंगार गुरुजी म्हणतात, ‘योग्य पद्धतीने योगासने करणे हेही आनंददायी असते व त्यातूनही मनाची शांती, प्रसन्नता मिळवता येते. या सर्व ध्यानपद्धती चित्त प्रसादनाच्या अनेक पद्धती आहेत. त्यांमध्ये अष्टांगयोग सर्वत्र गुंफलेला असतो. त्यांच्यामुळे शरीर, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती आणि अहंकारवृत्ती यांना सौंदर्य प्राप्त होत असते. या प्रक्रियेत प्राणाबरोबर प्रज्ञेचाही विचार आहे. प्राण ही विश्वचैतन्य शक्ती आहे, तर प्रज्ञा ही जाणीवयुक्त, विवेकपूर्ण बुद्धी होय. योगाभ्यास करताना प्राण आणि प्रज्ञा दोन्ही एकत्रित, एकसारख्या प्रवाहित व्हाव्या लागतात. प्राणाला धार लावावी लागते व प्रज्ञेला चकचकीत करून घ्यावे लागते. त्याचप्रमाणे प्राण आणि प्रज्ञेचे शुद्धीकरण आवश्यक असते.’

आजचे आसन आहे मरिचासन-२

  • दंडासनात बसा.

  • डावा पाय पद्मासनात वाकवा, डावा पाय उजव्या मांडीच्या मुळाशी व डावी टाच बेंबीला टेकलेली असेल.

  • उजवा पाय मरिचासनात वाकवा. उजवी टाच शिवणीला टेकवा. उजवी नडगी काटकोनात ठेवा. उजवी मांडी व पोटरी एकमेकींना टेकू द्या.

  • किंचित पुढे वाका. उजवी बगल काटकोनातील उजव्या नडगीला स्पर्शेल इतका उजवा खांदा पुढे न्या. श्वास सोडून उजवा हात उजवी नडगी आणि मांडी यांच्या भोवती वेढा. उजवे कोपर वाकवा आणि कोपरापासून पुढला हात पाठीमागे कमरेजवळ न्या. नंतर डावा हात पाठीमागे न्या आणि उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडा.

  • पाठीचा कणा वरच्या दिशेला ताणा आणि दीर्घ श्वसन करीत या स्थितीत काही सेकंद थांबा.

  • श्वास सोडा आणि पुढे वाकून हनुवटी डाव्या गुडघ्यावर टेकवा.

  • हेच आसन दुसऱ्या बाजूसही करा.

फायदे

  • पोटातील अवयव अधिक चांगल्या तऱ्हेने सशक्त होतात.

  • पचनशक्ती वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT